गणेश कदम, प्रतिनिधी
दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज दत्तनगर आंबेगाव येथील कामगार मजूर अड्ड्यावर युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने पेढे वाटून आणि मंजूरांमध्ये जनजागृती करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन प्रथमच साजरा करण्यात आला. यावेळी दक्षिण पुण्यातील असणाऱ्या मराठवाड्यातील स्थलांतरित कामगार बांधवांमध्ये न्याय व हक्कासाठी जनजागृती करण्यात आली.
यावेळी युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड बोलताना म्हणाले,मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार बांधव पुण्यासारख्या शहरात आपली उपजीविका भागवण्यासाठी येतात. त्यांच्या विविध समस्या सोडविण्याचे काम युवा संवाद सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत. मराठवाड्यातील सर्व कामगार बांधवांचे प्रश्न त्यांच्या मुलाच्या शिक्षण,आरोग्य आणि भाविष्य याविषयावर संस्था काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बांधकाम कामगारासाठी एकूण २९ विविध योजना उपलब्ध असून त्यांचा असंघटित कामगारांनी लाभ घ्यायला हवा. त्यांच्या आरोग्यसह सर्वांगीण विकासासाठी असणाऱ्या योजना तळागाळातील असंघटित कामगारांपर्यंत पोहचल्या पाहिजेत असेही गरड म्हणाले.
याप्रसंगी शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जांभळे पाटील,शिवधारा संघटनेचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे सरचिटणीस राहुल बेलदरे पाटील,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धोका, व्यावसायिक किशोर ओसवाल, युवा संवाद सामाजिक संस्थेचे गणेश कदम,परमेश्वर कोकाटे यांचेसह कामगार अड्ड्यावरील मजूर बंधू भगिनी उपस्थित होते.
——
प्रतिक्रिया : ‘नाक्यावरच्या कामगारांनी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा केला.नाक्यावरच्या कामगारांसाठी न्याय आणि जागृती करण्याचे काम आज इथे केले.आमच्या भविष्यातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक संस्थांनी मदत करण्याचे ग्वाही दिली.तसेच पेढे वाटप केले.
-आनंदराव कांबळे, परभणी ; मारुती पांढरे, कामगार नांदेड