आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अण्णासाहेब मगर काॅलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य मच्छिंद्र बाजीराव तौर ( वय ६७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने हडपसर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहीण, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते कराड येथील डॉ. स्वप्नील तौर यांचे वडील होत. सामाजिक कार्यकर्ते गणेश तौर, प्रगतशील शेतकरी रंगनाथ तौर,सुरेश तौर यांचे बंधू होत. हडपसर येथील अमरधाम स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी, मान्यवर उपस्थित होते.