अनिल चौधरी, पुणे
आज फक्त चूल आणि मूल हि संकल्पना मोडीत निघाली असून प्रत्येक क्षेत्रात महिला मोठ्या पदावर कार्यरत आहेत. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया बोलत्या व्हायला लागल्या, बदलत्या सामाजिक, आर्थीक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूपही बदलत आहे. आज महिलांनी आपले कर्तव्य प्रत्येक क्षेत्रात सिध्द केले आहे आणि करत आहे.महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारांनी समृद्ध राहिला असून, महिलांचा सन्मान करणे हि आपली संस्कृती आहे. त्यामुळे आजचा एक दिवस नाहीतर वर्षातील प्रत्येक ३६५ दिवस महिलांचा सन्मान झालाच पाहिजे असे मत प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी व्यक्त केले.
आजची स्त्री सुपर वुमन म्हणून ओळखली जात आहे असे सांगत आपली संस्कृती स्त्रियांची आदर करणारी असून, प्रयेक मुलांवर महिलांचा आदर करणारे संस्कार करावेत. त्यामुळे स्त्रियांचा अनादर होणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी आपल्या भाषणात मांडली. घरकामापासून अंतराळापर्यंत जवळपास सवर्च क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहेत.वैद्यकिय क्षेत्रात महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर असून त्या नवसंजीवनी देण्याचे काम करत आहेत. कुटुंब सांभाळत स्वावलंबनासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांचा आदर्श सर्वानीच घ्यावा. महिलांच्या नजरेसमोर निश्चित ध्येय असेल तर आणि त्याच्या पूर्णत्वासाठी मेहनत घेण्याची तयार असेल तर काहीच अश्यक्य नाही असे सांगत त्यांनी पुरुषांनी देखील महिलांच्या मागे व पुढे उभे न राहता सोबतीने चालले पाहिजे असे मत राजेंद्र भिंताडे यांनी यावेळी मांडले.
जागतिक महिला दिनानिमित्त मागील वर्षापासून ‘आदर्श आई पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली असून याही वर्षी आपल्या समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ३०० महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. उंड्री गावातील विशेष शेतकरी महिला, सरपंच, उपसरपंच, डॅाक्टर, वकील, पोलीस, नर्स, शिक्षिका तसेच कष्टकरी महिला यांना मानाचा फेटा बांधून व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.कोरोनाची लाट कायम असल्याकारणाने भव्य दिव्य कार्यक्रम न घेता ज्या त्या भागात जाऊन प्रत्यक्ष महिलांची भेट घेत फेटा व सन्मान चिन्ह देण्यात आले. यावेळी महिलांनी आपण करत असलेल्या कार्याची दखल घेतल्याने समाधान व्यक्त केले. कोंढवा पोलीस ठाण्यात महिला पोलीसांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी वरिष्ठ पो.नि.सरदार पाटील, वाहतुकीचे पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पो. उपनिरीक्षक म्हस्के मँडम, अँड उम्रीला जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध युवा उद्योजक राजेंद्र भिंताडे आणि महिला उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रेणुका भिंताडे यांनी केले होते.
याप्रसंगी शामली डॉ. प्रियंका मासाळ, शिक्षिका शशिकला दानवरे, सुरेखा माठे, सुनिता खोपडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राजेंद्र भिंताडे, हनुमंत घुले, संतोष गोरड ओंकार होले, विठ्ठल भिंताडे, तुषार भिंताडे, श्रीकांत भिंताडे, योगेश भिंताडे, अक्षय टकले, सचिन भिंताडे, महेश भिंताडे , जिल्हा परिषद सदस्य स्वाती टकले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती शारदाताई होले, ग्रामपंचायत सदस्य जयश्रीताई पुणेकर, गौरीताई फुलावरे, सामाजिक कार्यकर्त्या रेणुकांताई भिंताडे, जयश्री मासाळ, मायाताई कामठे, ललिता कामठे, अलका टकले, साधना कामठे, मीना होले, सुशील कड आदी उपस्थित होते.