Saturday, July 12, 2025
Google search engine
HomeMalhar Newsस्वतःच्या अंगावर शाई ओतून मंत्री व प्रशासनाच्या कारवाईचा हेमंत ढमढेरे यांचा अनोखा...

स्वतःच्या अंगावर शाई ओतून मंत्री व प्रशासनाच्या कारवाईचा हेमंत ढमढेरे यांचा अनोखा निषेध”

स्वतःच्या अंगावर शाई ओतून मंत्री व प्रशासनाच्या कारवाईचा हेमंत ढमढेरे यांचा अनोखा निषेध

जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकल्या प्रकरणी अकरा पोलीस अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले तसेच एका पत्रकाराला ताब्यात घेतले ही लोकशाही ची गळचेपी असून याच्या निषेधार्थ हेमंत ढमढेरे यांनी स्वतःच्या अंगावर शाही फेकून अनोख्या पद्धतीने निषेध केला.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांच्या विरोधात अवमानकारक विधाने केल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर एका युवकाने शाई फेक केली त्यामुळे अकरा पोलीस अधिकारी कर्मचारी निलंबित झाले तर एका पत्रकाराला व्हिडिओ काढल्या प्रकरणी ताब्यात घेतले.
महामानवांविरोधात बोलता आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करता हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचे सांगत महाजनहित प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर शाई फेकून सत्ताधारी मंत्री व प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन केले
तसेच थोर महामानवांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून शाईफेक केली तर पोलीस कारवाई करतात त्यामुळे मी स्वतःच्याच अंगावर शाई ओतून या घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध करीत असल्याचे हेमंत ढमढेरे यांनी सांगितले.
यावेळी महाजननीत संघटनेचे सहसचिव अशोक राऊत, संजय मेहता उपस्थित होते
राज्यभर चंद्रकांत पाटील समर्थक त्यांच्या बाजूने आंदोलन करत आहेत तर महामानवांचा अवमान केला म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहेत मात्र हेमंत ढमढेरे यांनी स्वतःच्याच अंगावर चेहऱ्यावर शाई ओतून या घटनेचा निषेध केला हा प्रकार पुण्या मध्ये चांगलाच रंगला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!