पुणे प्रतिनिधी,
श्रीराम धर्मदाय संस्था संचलित मनीषाज ब्युटी पार्लर यांच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी मोफत पार्लरचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनीषाज ब्युटी पार्लरच्या मनीषा पोतदार,अविनाश पोतदार आणि सर्व प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
प्रसंगी बोलताना नागपूरे म्हणाल्या,बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवल्या जाणाऱ्या सर्व कोर्सचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा तसेच स्वतः एक चांगल्या उद्योजिका बना अशा शुभेच्छा दिल्या.
मनीषा ब्युटी पार्लरच्या माध्यमातून महिलांना बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे.यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पार्लर कोर्स,मेकअप कोर्स,मेकअप आर्टिस्ट कोर्स,मेहंदी कोर्स शिकवले जाणार आहे.जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनीषा पोतदार यांनी यावेळी केले.
प्रसंगी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.प्रशिक्षण पूर्ण केलेला महिलांनी आपले अनुभव सांगितले. सर्व कोर्सेस हे मनीषाज लेडीज ब्युटी पार्लर,हिंगणे खुर्द,सिंहगड रोड येथून चालवले जाणार आहेत.
कोर्सेस विषाई अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक मनीषा पोतदार +919923762002