Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेपुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने आपण एक सुसंस्कृत महिला लोकप्रतिनिधीला मुकलो...

पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने आपण एक सुसंस्कृत महिला लोकप्रतिनिधीला मुकलो : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर/पुणे

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पणतसून आणि त्यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आणि पुण्याच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतंच दुःखद असं निधन झाल्याचे समजले. त्यांना विधानपरिषद सभागृहाच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करीत आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना झालेल्या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी आहे. त्यांच्या जाण्याने आपण एका सुसंस्कृत महिला लोकप्रतिनिधीला मुकलो आहोत.

कै. श्रीमती मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. या काळामध्ये मी सुचविलेल्या पुण्याच्या अनेक विषयांवर बैठका घेण्याबद्दल त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचे आणि माझे वैयक्तिक स्वरूपाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या आठवणी कायम स्वरुपी स्मरणात राहतील.

—–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!