मिस चार्म २०२३ मध्ये सताक्षी भानोट करणार भारताचे प्रतिनिधित्व

241

२५ वर्षीय दिवा सताक्षी करणार जगभरातील सुंदरींसोबत प्रतिस्पर्धा.

प्रनिल चौधरी, पुणे

व्हिएतनामचे मिस चार्म ऑर्गेनाइजेशन १६ फेब्रुवारी रोजी होणार्या मिस चार्म २०२३ स्पर्धेसाठी सज्ज आहे , हो ची मिन्ह सिटी येथे या स्पर्धेचे आयोजन होणार असुन, जगभरातील सौंदर्यवती या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होतील. या ब्यूटी पेजंट द्वारे जगातील विविध देशांतील अनोख्या प्रतिभा संप्पन महीला प्रतिनिधी जगासमोर येतील आणि, त्या सौंदर्य तसेच त्यांची संस्कृती आणि शैक्षणिक पार्श्वभूमीच्या जोरावर आप-आपल्या देशांचे प्रतिनिधित्व करतील. मिस चार्मसाठी २०२३ साठी २५ वर्षीय सताक्षी भानोट व्हिएतनाममधील या मेगा इव्हेंटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असून ती १७० सेंमी उंच, सौंदर्य क्षेत्रातील अनुभवी आणि आत्मविश्वासु युवती आहे. तिने एमआयटी, पुणे येथून इंटरनॅशनल बिजनेसमध्ये पदवी आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची पदव्युत्तर डिग्री देखील घेतली आहे.ती बिलियनेअर माइंडसेट वॉल २ या पुस्तकाची सह-लेखीका देखील आहे. सताक्षी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा सन्मान आणि जबाबदारी समजते. ज्यासाठी तिने कठोर प्रशिक्षण घेतले आहे आणि तीचा विश्वास आहे की स्टेजवर पर्फोर्मन्स देताना भारतीयांना तीचा अभिमान वाटावा यासाठी ती सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल. ती म्हणते मेहनत आणि समर्पण स्पर्धेसाठी आवश्यक आहे, तसेच सौंदर्य स्पर्धा म्हणजे केवळ मंचावर चांगले दिसने नव्हे तर एकुण व्यक्तिमत्व सक्षम असणे देखील यासाठी आवश्यक आहे. ब्यूटी क्वीन, मिस चार्म इंडिया २०२३ बनने तिचे सर्वात मोठे स्वप्न आहे. सताक्षी स्वत: ला एक निश्चिंत, आनंदी, सकारात्मक आणि उत्कट स्त्री समजते, जी आयुष्यातील नवीन आव्हाने स्वीकारण्यास तयार आहे आणि मिस चार्म २०२३ चे व्यासपीठ त्यापैकी एक आहे. साताक्षीसाठी मिशेल ओबामा प्रेरणास्थान आहेत. त्या अत्यंत सकारात्मक महिला आहेत आणि त्यांनी एक व्यक्ती म्हणून स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सताक्षी म्हणते कि तिच्या आजूबाजूच्या लोकांनी तीला नेहमीच समर्थन दिली आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित केले, विशेषत: टियारा पेजंट ट्रेनिंग स्टुडिओची संस्थापीका व तिची स्पर्धक प्रशिक्षिका रितिका रामत्री .

मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांच्या दुनियेत सताक्षी नवीन नाही. विविध डिझाइनर आणि ब्रँडसाठी स्टेजवर पर्फोमन्स बरोबरच, ती कॅम्पस प्रिन्सेस २०१९ आणि जीएसआय सुपरमॉडेल इंडियामध्ये नॅशनल फायनलिस्ट होती, याशिवाय ती फेमिना मिस इंडिया नॉर्थ फायनलीस्ट देखील होती आणि किको मिलानो या ब्रॅंडची इंटरनॅशनल फेस होती. तिच्या अथक प्रयत्नांमुळे व परिश्रमामुळेच आता ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न साकार करणार आहे.

सताक्षी दृढ, आत्मविश्वास असणारी एक सुंदर युवती आहे, ती देशातील युवतींना सांगू इच्छिते की ब्यूटी क्विन बणण्याची इच्छा बाळगणार्या किंवा आयुष्यात कोणत्याही गोष्टीची इच्छा बाळगणाऱ्या तरूणींनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि कठोर परिश्रम घेतले पाहिजेत, ती त्यांना त्यांच्या प्रयत्नात साथ देण्यास उत्सुक आहे. रॉबिन हूड आर्मीमध्ये राहून तिने अरुणाचल प्रदेशातील एका अनाथाश्रमास देखील मदत केली आहे.