गिरीश भोपी,पनवेल
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद्य असणारे रयत शिक्षण संस्थेचे कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शुक्रवार दि २४ फेब्रुवारी रोजी मिलान लॅबोरेटरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सौजन्याने विद्यालयात तयार केलेल्या आधुनिक गार्डनचे उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमाला मिलान लॅबोरेटरीच्या डायरेक्टर सौ. रोहिनी डोंगरे मॅडम, उपेंद्र देशपांडे सर डायरेक्टर , आणि मेघ हजिरणीस विनोद तारेकर ठाणे उपटाऊन रोटरी क्लब चे अध्यक्ष ललिता अरगेकर आणि उल्हास अरगेकर, .लक्ष्मण भोपी, रुत्विच डोंगरे, अभिलाष पिल्ले स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन श्री जयदास गोवारी, व्हॉईस चेअरमन विनायक म्हात्रे मुख्याध्यापक चालके, माजी चेअरमन स्वामी म्हात्रे, बालाराम चिपलेकर सदस्य विनायक गोवारी आणि शाळेतील विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. राहुल चिपलेकर आणि अनिल पाटील यांनी केले. या वेळेस गार्डन मधील बसलेल्या खेळण्याचा मुलांनी आनंद घेतला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता