आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाविकांनी माऊलींचे संजीवन समाधीचे दर्शनास गर्दी केली. यावेळी श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. श्रींचे संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन झाल्याने भाविक, नागरिकांतून तसेच व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले. पहाटे नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांना पहाटे साडेपाच नंतर श्रींचे स्पर्श दर्शनास गाभारा खुला झाला. पहाटे पासूनच पंचक्रोशीतून भाविकांनी आळंदीत दर्शनास मंदिर परिसरात गर्दी केली होती. गुढीपाडव्या निमित्त माऊलींचे संजीवन समाधीवर महागणपती ( रांजणगाव ) चंदन उटी अवतार साकारण्यात आला.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते श्रींची पवमान अभिषेख पूजा झाली. त्यानंतर महिम्न पूजा झाल्या. आळंदी देवस्थानने कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन व्यवस्था केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. गुढी पाडाव्या निमित्त भाविकांतून मोठा उत्साह होता. पहाटे पासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या. नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रमात भाविकांच्या पंचोपचार श्रींचे पाद्य पूजा चल पादुका पूजा देखील झाल्या.
परंपरेने मंदिरात गुढी पूजन, श्रींचे चलपादुका पूजा भाविकांनी केल्या. यासाठी आळंदी देवस्थानने व्यवस्था केली. मंदिरात दर्शन व्यवस्था सुलभ करण्यात आल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले. भाविकांच्या चलपादुका पूजा गणेश मंदिर मंडपात आणि श्रींचे गाभा-यात श्रींचे समाधीचे थेट स्पर्श दर्शन एकाच वेळी सुरु ठेवल्याने गर्दीवर नियंत्रण मिळाले. श्री स्वामी महाराज मंदिरात गुढी पाडव्यापासून चंदन उटी लेप सह विविध अवतार साकारण्यास सुरुवात करण्यात आली. गणेश अवतार प्रथम साकारत लेप लावण्यास सुरुवात करण्यात आली. श्री नृरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या संजीवन समाधी वर गांधी परिवाराने गणेश अवतार चंदन उटी साकारली. आळंदी येथील श्री संत गोरोबा काका समाधी मंदिरात चंदन उटीगणेश अवतार साकारण्यात आला. किरण दाते, किशोर दाते, बल्लाळेश्वर वाघमारे यांनी चंदन उटी साकारली.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन घेत भाविकांनी परिसरातील दुकानांतून प्रसाद, साहित्य घेण्यास गर्दी केली. यामुळे आळंदीतील आर्थिक उलाढाल देखील वाढली. यामुळे नागरिक, भाविक, व्यावसायिक, मंदिर परिसरातील व्यापारी यांच्यात समाधानाचे वातावरण दिसले. सन उपक्रमांतून दळणवळण वाढून रोजीरोटी साठीची उलाढाल वाढल्याने व्यापा-यांत आनंदाचे वातावरण होते.
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्या पासून पुढे श्रींचे संजीवन समाधीला चंदन उटी चा लेप महिना भर लावण्यात येतो. दरम्यानचे काळात मंदिरात चार अवतार चंदन उटीचा वापर करून लक्षवेधी साकारले जातात. यावर्षी परंपरे प्रमाणे पहिला अवतार रांजणगाव येथील महागणपती गणेशावतार साकारण्यात आले. श्रींचे उटीतील वैभवीरूप दर्शन लक्षवेधी होते. उटी दर्शनास माऊली मंदिर येथे तसेच भाविकांनी श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात चंदन उटी पाहण्यास गर्दी केली. स्वामी महाराज मठात गांधी परिवाराने परिश्रम पूर्वक श्रींचे संजीवन समाधीवर गणेशावतार चंदन उटीतून लक्षवेधी साकारला.येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने करण्यात आलेली चंदन उटी अवतार श्री वरदविनायक गणपती, श्रीक्षेत्र महड येथील साकारण्यात आला होता. यासाठी श्री संत गोरोबाकाकांचे वंशपरंपरागत पुजारी किशोर दाते, किरण दाते, बल्लाळेश्वर वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती माता, लहान बालकांसाठी आळंदी देवस्थान कमिटीने ऑनलाइन दर्शन व्यवस्था सुरु केली आहे. या सेवा सुविधेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केले आहे. मंदिरात परंपरेने धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन सेवा झाली. श्रींना महानैवेद्य झाला. मराठी नववर्ष आणि गुढी पाडवा यानिमित्त परिसरात विविध दुकाने आणि उपक्रमाचे उदघाटन, भूमिपूजन उत्साहात करण्यात आले.
Home
ताज्या घडामोडी आळंदी मंदिरात श्रींचे स्पर्श दर्शनास भाविकांची गर्दी ; श्रींचा चंदनउटी गणेशावतार साकारला