Monday, April 28, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेयशस्वतीतेसाठी जिंकण्याबरोबरच हारणे महत्वाचे ;प्रेरक वक्ता शिव खेरा

यशस्वतीतेसाठी जिंकण्याबरोबरच हारणे महत्वाचे ;प्रेरक वक्ता शिव खेरा

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे वार्तालाप

प्रनील चौधरी,पुणे

जीवनात अनेक वेळा अपयशानंतर ही पुन्हा नव्या जोमाने उभे राहणे यालाच यशस्वी होणे असे म्हणू शकतो. जिंकणे आणि हरणे या दोन्ही गोष्टींनी मिळून जीवन बनते. आजच्या मुलांना जिंकण्याबरोबरच हारणे सुद्धा किती महत्वाचे हे समजावून सांगणे काळाची गरजचे आहे.” असे विचार प्रसिद्ध लेखक व प्रेरक वक्ता शिव  खेरा यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ बिजनेसतर्फे आयोजित कार्यक्रमात व्यवस्थापन विभागातील १२० प्राध्यापकांना व्यवस्थापन संदर्भात शिव खेरा यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यानिमित्ताने शिव खेरा यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. तपन पांडा, स्कूल ऑफ बिजनेसचे अधिष्ठाता डॉ. दिपेन्द्र शर्मा, स्कूल ऑफ इकॉनॉमी अ‍ॅण्ड कॉमर्सच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. अंजली साने उपस्थित होत्या.
शिव खेरा म्हणाले,“ हारल्यामुळे मुले डिप्रेशनमध्ये जातात. अशावेळेस सकारात्मक दृष्टीने त्यांना जिंकण्यासाठी हारणे किती महत्वाचे आहे हे आईवडिलांनी समजावून सांगावे. यशस्वीतेसाठी जिंकण्याची सवय अंगिकारावी. त्यासाठी सतत सकारात्मक व्यवहाराला आपली सवय बनवा. चांगल सवयींमुळे चरित्र बनते तर वाईट सवयीमुळे चरित्र बिघडते. तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे कसे आहेत हे दाखविण्यासाठी कठिण परिश्रम, प्रामाणिकता, नवनवीन ज्ञान मिळवणे आणि सकारात्मक व्यवहार ठेवावा.”
“ स्वामी विवेकानंद, गुरूनानक यांच्या जीवन चरित्रांचा अभ्यास केल्यास सकारात्मक विश्वास वृद्धिंगत होतो. आजच्या काळात जाती व्यवस्था, धार्मिक थोतांड, भविष्य, मिडियाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार्‍या अंधश्रध्दाळू गोष्टी मानवाला पतनाकडे घेऊन जात आहे. हळू हळू आम्ही भाग्यवादी बनत आहोत हे खूप चुकीचे आहे.”
“ आजच्या शिक्षण पद्धतीवर शिव खेरा म्हणाले, भारतात एक समान शिक्षण प्रणाली असावी. त्यामुळे देशातील सर्व मुलांना एक समान संधी मिळेल. या देशातील एनआरआय व्यक्ती प्रचंड हुशार असून ते यशस्वी झाले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांची संस्कारीत अर्धांगिणी जी सुख व दुःखात त्यांच्या सोबत असते आणि त्याच जोरावर व्यक्ती यशस्वीतेची पायरी चढत असतो.”
“ उत्तम लिडशीपमुळे देशात परिवर्तनाची लहर आली आहे. ज्या पद्धतीचे नेतृत्व आहे ते योग्य दिशेने वाटचाल करीत आहेत. परंतू ७५ वर्षाच्या राजकारणातील वाटचाल पाहता हे नेतृत्व बरे आहे पण उत्तम नाही. असे ही शिव खेरा म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!