निकृष्ट कामांमुळे शासन व महापालिकेकडून कोट्यावधी निधीचा अपव्यय

157

महाजनहित संघटनेचे हडपसर मध्ये लक्षवेधी आंदोलन

पुणे (प्रतिनिधी )

पुणे महानगरपालिका हद्दीतील समस्या व नियोजन शून्य विकास कामांमुळे कोट्यावधी रुपयांचा अपव्यय होत असून याकडे लक्ष वेधण्यासाठी महा जनहित प्रतिष्ठानच्या वतीने हडपसर मध्ये निषेध आंदोलन करण्यात आले.
महाजनहित प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे यांच्या पुढाकारातून झालेला या आंदोलनास आमदार चेतन तुपे, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, सुनील बनकर,
काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, शिवसेना संघटक नितीन गावडे, महेंद्र बनकर, सुरेश हडदरे, उद्योजक विजय भाडळे, माजी स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे, नितीन आरु, सागरराजे भोसले, के.टी.आरु, तुषार गोफने, कन्हेया पालेशा, सतीश भिसे, असलम जमादार, आपचे दिलीप गायकवाड, नामदेव साखरे, मनसेचे अतिश कुऱ्हाडे, तुकाराम ससाणे, आदी उपस्थित होते.

महापालिकेत प्रशासन राज असल्यामुळे त्यावर कुणाचा अंकुश नाही त्यामुळे कोणतेही नियोजन नसल्याने कोट्यावधी रुपयांची विकास कामे चुकीच्या पद्धतीने सुरू आहे नागरिकांचा कर रुपी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून जन आंदोलन उभारले पाहिजे असे प्रतिपादन आमदार चेतन तुपे यांनी यावेळी केले.

चुकीचे निकष लावून चांगले रस्ते खोदले जातात महानगरपालिका व राज्य शासनाच्या निधीची उधळपट्टी केली जाते यावर अंकुश कोण बसवणार जेथे गरज असते तेथे नागरी सुविधा पुरवल्या जात नाही याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आंदोलन केले यामध्ये सुधारणा झाली नाही तर पुणे शहर व जिल्ह्यात चौका चौकात आंदोलन केले जाईल असा इशारा महाजनहीत प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे यांनी दिला.

आंदोलनाचे नियोजन हेमंत ढमढेरे, अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली संजय मेहता शामराव शिंदे, गिरीश टिबे, विपुल भाडळे, राजू बोन्डगे, अमर चौधरी, धनंजय पोतदार यांनी केले.