उत्कृष्ट संशोधन पद्धत्तीस चालना देण्यासाठी आयएसबी  अँड  एम (ISB&M) पुणे कडून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम

182

पुणे 

इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया, पुणे यांनी १२ ते १८ जून २०२३ या कालावधीत “डेव्हलप युवर पॅशन अँड इनर ड्राईव्ह टू बी स्कॉलर: टेक द फर्स्ट स्टेप्स” या संशोधना वर आधारित अश्या एका फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे यशस्वी आयोजन केले होते.

यात सहभागींना याद्वारे संशोधना विषयीचे आवश्यक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याची पद्धत्त शिकण्यात मदत झाली. या मार्दगर्शनाच्या मदतीने बिझनेस स्कूलमधील यात सहभागींना आपल्या संशोधनस टॉप टियर जर्नल्समध्ये प्रकाशित करण्यास मदत मिळेल. डॉ. प्रमोद कुमार (अध्यक्ष,आयएसबी अँड   एम ग्रुप) आणि प्रा. अरुण जोशी (आयएसबी अँड  एम पुणेचे संशोधन अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आठवडाभर चाललेल्या या कार्यक्रमात विविध शैक्षणिक संस्थांमधील नामवंत विद्वान आणि प्राध्यापक उपस्थित होते, ज्यांनी संशोधन लेखन आणि प्रकाशनाशी संबंधित विविध विषयांवर त्यांचे कौशल्य आणि अनुभव शेअर केले.

आयएसबी अॅण्ड एम ने सहभागींना प्रशिक्षित करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध अश्या अनेक विद्वानांना आमंत्रित केले होते, ज्यांना नामवंत संस्थांमधील टॉप टियर जर्नल्स मध्ये प्रकाशनाचा विस्तृत अनुभव आहे. यातील प्रख्यात वक्त्यां मध्ये प्रो. संदीप कृष्णमूर्ती ( युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन (बोथेल) स्कूल ऑफ बिझनेस चे डीन), प्रो. एस. श्रीनिवासन (आयआयटी मद्रास) प्रो. एस. चंद्रशेखर (आयजीआयडीआर मुंबई), प्रो. शिव-गणेश भार्गव (आयआयटी बॉम्बे), प्रो. अब्राहम (सिरिल इस्सॅक आयआयटी गुवाहाटी), डॉ. परमा बराई (आयआयटी खरगपूर), प्रो. पिताबस मोहंती (एक्सएलआरआय जमशेदपूर), प्रो. रंजन दास ( द स्ट्रॅटेजी अकादमीचे अध्यक्ष), द नेक्स्ट आयडिएशन, आयआयएम बंगलोर चे प्राध्यापक. बी. महादेवन आणि मेंबर ऑफ द बोर्ड ऑफ गव्हर्नन्स अँड फाउंडर व्हाईस चांसलर चिन्मय विश्वविद्यापीठ डॉ. उमामहेश्वरराव जाडा, एनआयटी दुर्गापूर आणि इनहाऊस फॅकल्टी यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात संशोधन, लेखन आणि प्रकाशनांशी संबंधित विविध विषयांचा समावेश होता, ज्यात विषयांची ओळख, संशोधन पद्धती, डेटा अॅनेलेसिस, संशोधनाचे योगदान आणि हस्तलिखित तयार करणे समाविष्ट होते. या विविध सत्रांमध्ये सहभागींना संशोधन आणि प्रकाशन प्रक्रियेबद्दल मौल्यवान माहिती प्रदान करण्यात आली, आणि विविध फायद्यांवर प्रकाश टाकण्यात आला.

एफडीपी मध्ये सहभागी झालेले आरआयआयएम पुणे चे सहाय्यक प्राध्यापक म्हणाले, “आमची संशोधन कौशल्ये वाढवण्याची देखील ही एक उत्तम संधी होती. ही सर्व सत्रे माहितीपूर्ण आणि विशेष होती, यावेळी उपस्थित वक्ते हे जाणकार आणि अनुभवी होते. यातुन आम्हाला संशोधन व प्रकाशन प्रक्रियेबद्दल मौल्यवान माहिती मिळाली, जी की मला माझ्या भविष्यातील प्रयत्नांसाठी मदतगार ठरेल.”

विख्यात प्राध्यापक रामधर सिंग यांनी यावेळी आपल्या मुख्य भाषणात, संशोधनाची दुर्दशा, अर्थ आणि इतर अनेक बाबिंवर प्रकाश टाकला, शैक्षणिक संस्थांमधील उच्च-गुणवत्ता संशोधनाच्या महत्त्वावर जोर दिला आणि विशेषतः डॉक्टरेट डिसर्टेशन अॅण्ड रिसर्च पेपर्सच्या चिंताजनक स्थितीवर प्रकाश टाकला. प्रो. सिंग यांनी संशोधन म्हणजे काय, का, आणि कसे याबाबत मार्गदर्शन केले आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे संशोधन आणि प्रकाशनासाठी हस्तलिखित तयार करणे या विषयावर व्याख्याने दिली.

इंटरनेशनल स्कूल ऑफ बिजनेस एंड मिडिया (ISB&M) पुणे हे पुणे आणि संपुर्ण भारतातील एक प्रमुख आणि दूसर्या क्रमांकाचे सर्वाधिक पसंतीचे बिझनेस स्कूल आहे, ज्याची स्थापना २००० मध्ये डॉ. प्रमोद कुमार यांनी केली होती, या स्थापनेचा उद्येश्य होता उच्च-गुणवत्तेचे मॅनेजमेंट एज्यूकेशन प्रदान करणे