नियमित योग करा , निरोगी राहा; दिनेश होले

176

जागतिक योग दिनानिमित्त वानवडी येथील भैरोबानाला येथे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, नवचैतन्य हास्य परिवार, इंडियन स्पोर्ट्स असोसिएशन, भारतीय सिंधू सभा व दैनिक सकाळ च्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे जागतिक योग दिनाचे आयोजन बी टी कवडे रोड वरील स्व. जयसिंगराव ससाणे उद्यान येथे करण्यात आले होते. यावेळी शंख नादाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन 
सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, अनुलोम-विलोम, प्राणायाम, हास्य योगाचा अभ्यास घेण्यात आला. यामध्ये 
नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उत्साहात सहभाग घेतला. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना भाजपाचे युवा नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश होले म्हणाले की रोज नियमित योगा करा, आरोग्याची काळजी घ्या तसेच योगा केल्याने आपण निरोगी राहतो.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद उर्फ दिनेश होले, योगशिक्षक प्रकाश आरगडे, सुरेश हेमनानी, जितू अडवाणी, युवराज मिर्खलकर, चंद्रकांत क्षीरसागर, अरुण भुजबळ, माणिक जांभुळकर, संजय पवार, योगशिक्षिका मोरे काकू, हिना गंगवानी उपस्थित होते.