कोंढवा प्रतिनिधी ,
ब्रम्हमूहुर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने रविवारी “एक दिवसआपल्या हृदयासाठी ” हार्ट अटक समज व गैरसमज तसेच सीपी आर विषयी विशेष कार्यशाळेचे मोफत आयोजन करण्यातआले आहे. सदर कार्यक्रम रविवार दिनांक सहा ऑगस्ट रोजीपहाटे ४.३० ते ६.३० या वेळेत लोणकर लॉन्स , एन आय बीएम रोड, कोंढवा खुर्द पुणे या ठिकाणी होणार असून पुण्यातीलसुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ हे मार्गदर्शन करणारआहेत. यावेळी योगगुरू श्री दीपकजी महाराज हे सुद्धा मार्गदर्शनकरणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असणार आहे. कार्यक्रमासाठी नावनोंदणी महत्वाची असून फक्त एका क्यूआरद्वारे किंवा फोन नंबर द्वारे आपली नोंदणी करू शकता .
ब्रम्हमूहुर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने पुणे शहरातील विविधभागात मोफत क्लासेस सुरु आहेत . दरदोज पहाटे ४.३० ते ६.३०या वेळात हे योगा क्लासेस विविध तज्ञ प्रशिक्षकांद्वारे शात्रोस्त्रयोग प्रशिक्षण दिले जाते. हे योगा क्लासेस संपूर्णपणे मोफतअसून जास्तीत जास्त नागरिकांनी ह्याचा लाभ घेण्याचे आवाहनब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे योगाचार्य श्री दीपकजी महाराजयांनी केले आहे. कोंढवा येथील लोणकर हॉल, कात्रज कोंढवारोडवरील माउली गार्डन, बालाजी नगर शिवछत्रपती हॉल , सहकारनगर , आंबेगाव , तसेच कात्रज परिसरात हे योगप्रक्षिक्षण मोफत अविरतपणे सुरु आहे. या कलासेसचे वैशिष्ट्येम्हणजे रोज वेगवेगळे योग प्रशिक्षक आपली सेवा मोफत देतआहेत.
तरी कोंढवा येथील लोणकर लॉन्स येथे होणाऱ्या ह्रदयरोगासंदर्भात होणाऱ्या मोफत योग शिबिरास नागरिकांनी मोठ्याप्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्राचे अध्यक्ष शशिकांतआनंदास , अध्यक्षा अश्विनीताई पासलकर , सुधीर गरूड , अनिल राऊत , कालिदास लोणकर, रवींद्र औटी , आरती कदम, प्रतिभा मोरे, संदीप भिलारे, तानाजी लोणकर, शशिकांत पुणेकर, राजेंद्र भिंताडे, विजय लोणकर, दादा रणदिवे, दाभाडे सर, अनंतटेकाडे, दादा रणदिवे, नाना फुलावरे , संतोष गोरड, दर्शन किराड, सतीश शिंदे, गणेश नलावडे, नवनाथ मोरे, सुरेश कचरे, प्रदीपपवार ,संजय पडवळ, प्रसाद गव्हाणे, श्याम भामरे, प्रवीण पवार, शंकर शिंदे, अनिल चौधरी यांनी केले आहे.