लहुजी छावा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्याना शालेय साहित्यांचे वाटप 

466

कोंढवा प्रतिनिधी,

 कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्ये, पदे, गीते अशी विविध साहित्यातून अण्णाभाऊंनी  शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करत कायम शिक्षणाचा प्रसार केला अशा थोर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित लहुजी छावा प्रतिष्ठानतर्फे पुणे महानगरपालिकेच्या कोंढवा खुर्द येथील संत गाडगे महाराज शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.

 लहुजी छावा प्रतिष्ठान शिवनेरी नगर कोंढवा खुर्द येथे कार्यरत असून ते अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. प्रतिष्ठाण पूर , भूकंप तसेच इतर नैसर्गिक हानीच्या वेळी नागरिकांच्या मदतीला त्वरित जाऊन त्यांना सेर्वतपरी  मदत करत असतात. लहुजी छावा प्रतिष्ठान हे खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपत आहे , असेच येथील स्थानिक नागरिक सांगतात

  राजेश शर्मा यांनी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की, अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे यांना एकूण तीन अपत्य होती, मधुकर, शांता आणि शकुंतला असे त्यांचे नाव. साठे यांचे शालेय शिक्षण झालेले नाही. याचे कारण म्हणजे, सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी अवघ्या दीड दिवसामध्येच शाळेत जाणे सोडून दिले होते. मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईमध्ये अंगावर पडेल ते काम त्यांनी केले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजेश शर्मा,सचिन थोरात, आकाश पौळ, स्वागत ढावरे , धनराज चोरमले, अतुल उमप, निखिल ढावरे, मित्तल लिलींगे, सचिन लोखंडे, सुरज भंडलकर, राहुल इंदापूर, आदेश वाघमारे यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लांडगे गुरुजी यांनी केले.