अनिल चौधरी , पुणे
स्पर्धा परीक्षेमुळे वाढणारा तणाव तसेच या तणावामुळे आहार-विहाराच्या चुकीच्या सवयी निर्माण होऊ शकतात. एकाच जागी बराच वेळ बसणे, व्यायाम न करणे आणि अनियमित आणि अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाणे तसेच बदललेली जीवनशैली ,यामुळेही हृदयावर परिणाम होऊन आपण ह्रदय रोगाला आमंत्रण देत आहोत त्यामुळे संतुलित आणि सकस आहार घेऊन ह्रदय रोगाला दूर करण्याचे आवाहन डॉकटर जगदीश हिरेमठ यांनी ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या “एक दिवस आपल्या हृदयासाठी ” वर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
ब्रम्हमूहुर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने रविवारी “एक दिवस आपल्या हृदयासाठी ” हार्ट अटक समज व गैरसमज तसेच सी पी आर विषयी विशेष कार्यशाळेचे मोफत आयोजन करण्यात आले . सदर कार्यक्रम रविवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात पार पडला.
यावेळी बोलताना डॉ.जगदीश हिरेमठ म्हणाले कि, चुकीची जीवनशैली महत्त्वाचे कारण असून वयाच्या 20 व्या वर्षापासून तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे हे तुमचे प्राधान्य असले पाहिजे. स्पर्धा परीक्षेमुळे वाढणारा तणाव तसेच या तणावामुळे आहार-विहाराच्या चुकीच्या सवयी निर्माण होऊ शकतात. एकाच जागी बराच वेळ बसणे, व्यायाम न करणे आणि अनियमित आणि अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळेही हृदयावर परिणाम होऊ शकतो. मिठाचे मर्यादित सेवन करा . उच्च रक्तदाबामुळे तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो हे प्रत्येकालाच माहीत असते . त्यामुळे आहारात मिठाचे सेवन मर्यादित करून रक्तदाब नियंत्रित करणे गरजेचे राहील. दररोज किंवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा.रक्तदाबासोबतच तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. यामुळे तुम्हाला हृदयाच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होईल. आजकाल वयाच्या कोणत्याही टप्प्यात हे आजार होऊ शकतात याची जाणीव ठेवा.
संतुलित आहाराचे सेवन करा.सर्व महत्त्वाच्या पोषक घटकांचा समावेश असलेला आहार घेणे उत्तम राहिल. निरोगी खाण्याच्या पद्धतींचे पालन करा. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, मसूर, काजू आणि तेलबियांची निवड करा. पुरेसे प्रथिने खाण्याचा प्रयत्न करा आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या. ते तुम्हाला काय खावे आणि काय टाळावे याविषयी मार्गदर्शन करतील.वजन नियंत्रणात ठेवा.जंक फूड, मसालेदार, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा. लठ्ठपणा हा सर्व रोगांची आमंत्रण देतो आणि हृदयाच्या समस्यांना बळी पडू शकतो. योग्य वजन राखणे गरजेचे आहे.धुम्रपान टाळा. धुम्रपान केवळ फुफ्फुसांनाच नाही तर हृदयासही हानिकारक ठरते. हे हृदयविकाराच्या प्रमुख घटकांपैकी एक आहे. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या घट्ट होतात आणि संकुचित होतात, ज्यामुळे प्लेक तयार होतात आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची शक्यता वाढते.कौटुंबिक इतिहास जाणून घ्या.कौटुंबिक इतिहास जाणून नियमित हृदय तपासणीसाठी जा: जर तुमच्या कुटुंबातील कोणाला हृदयाची समस्या असेल तर तुम्ही देखील वेळोवेळी तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार दर ६ महिन्यांनी किंवा वर्षानंतर नियमित हृदय तपासणी करणे आवश्यक आहे. असे केल्याने तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवू शकता.
याप्रसंगी बोलताना मा. आम. महादेव बाबर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . सर्वच नागरिकांनी नियमित योगा तसेच विविध प्रकारचे व्यायाम करुन आपले शरीर निरोगी ठेवावे तसेच योग्य आहार घेऊन आपले वजन निंत्रणात ठेवावे असे मार्गदर्शन केले.
यावेळी मा.आ महादेव बाबर, मा नगरसेवक भरत चौधरी, तानाजी लोणकर, साईनाथ बाबर,केंद्राचे अध्यक्ष शशिकांत आनंदास , अध्यक्षा अश्विनीताई पासलकर , सुधीर गरूड , मधुकर सुरवसे, अनिल राऊत , कालिदास लोणकर, रवींद्र औटी , आरती कदम, प्रतिभा मोरे, संदीप भिलारे,शशिकांत पुणेकर, राजेंद्र भिंताडे, विजय लोणकर, दादा रणदिवे, उमेश दाभाडे, अनंत टेकाडे, दादा रणदिवे, नाना फुलावरे ,संतोष गोरड, सतीश शिंदे, गणेश नलावडे, नवनाथ मोरे, प्रदीप पवार ,संजय पडवळ, शंकर शिंदे, भानुदास होले, रेणुका भिंताडे, जयश्री पुणेकर , गौरी फुलावरे, नंदा लोणकर, सुनीता आगरवाल, उर्मिला भालेराव, गोगाव महिला सरपंच वनिता सुरवसे,अनिता कनोजिया, भावना घरोडिया, गायत्री लोणकर, लीना परदेशी, रुपाली लोणकर, शोभा गोसावी, वंदना तोंडले, दिपाली भिंताडे,अनिल चौधरी आदी उपस्थित होते