कोंढवा प्रतिनीधी,
कोंढवा खुर्द मधील शिवनेरी नगर येथील ब्रम्हा अव्हेन्यु जवळील हंसकुटी आश्रम यांच्या श्री हंस जी महाराज पथ नामफलकाचे उदघाटन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रयत्नातून विभुजी महाराज यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले .यावेळी कोंढवा खुर्ध ग्रामस्थ, शिवनेरीनगर येथील नागरिक आणि हंसकुटी चे साधक वर्ग , मनसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विभूजी महाराज म्हणाले की, आपल्या कोंढव्याला साधुसंतांची मोठी परंपरा आहे. आमच्या हंसजी महाराज यांच्या नावाने रस्त्याला नाव दिल्याने या भागात कायम साधू संतांचा वास राहील. तसेच आम्ही कोंढवा वासियांचे तसेच ग्रामस्थांचे विशेष आभार मानतो. तर साईनाथ बाबर यांनी आपल्या भाषणात आपल्या पुढे अनेक योजना असून पुढील निवडणुकीनंतर आपण कोंढवा गावठान तसेच शिवनेरी नगरचा कायापालट करू असे आश्वासन यावेळी दिले.