Wednesday, July 16, 2025
Google search engine
HomeMalhar Newsमराठा मोर्चा, आंदोलनात पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखली... "सकल हडपसर मराठा समाजाच्या वतीने...

मराठा मोर्चा, आंदोलनात पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखली… “सकल हडपसर मराठा समाजाच्या वतीने हडपसरमध्ये सन्मान सोहळा…

पुणे (प्रतिनिधी )

सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा हडपसर च्या वतीने दोन महिन्यांमध्ये मराठा मोर्चा, आंदोलने असतील किंवा साखळी उपोषण असतील यामध्ये हडपसर पोलीस स्टेशन आणि हडपसर वाहतूक विभाग यांनी कर्तव्य बजावले, पोलिसांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन दिवाळी सण निमित्ताने सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करून ऋण व्यक्त करण्यात आले.
हडपसर पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच हडपसर वाहतूक विभागामधील अधिकारी व कर्मचारी मराठा बांधव देखील यावेळी उपस्थित होते.
हडपसर पोलीस स्टेशन येथे झालेल्या या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, वाहतूक पोलीस निरीक्षक उल्हास कदम, गुन्हेचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, शिवले साहेब, संदीप लहाने पाटील, उल्हास तुपे, डॉ. शंतनू जगदाळे, बाळासाहेब घुले, बाळासाहेब भिसे, अनिल मोरे, प्रवीण अबदागिरे, सचिन दाभाडे, दिनेश शिंदे, महेश टेळे, निलेश काळे, विश्वास शिंदे, संतोष घाडगे, विठ्ठल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वांना शाल फुले आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
मराठा समाजाने हडपसर व परिसरात अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलने व उपोषणे केली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली दिलेली कामे योग्य रीतीने केली हडपसर अधिक सामाजिक सलोखा बिघडणार नाही यासाठी आम्ही सदैव कार्यरत आहोत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी यावेळी दिली.
पोलिसांनी केलेल्या कार्याची दखल समाजातील दक्ष नागरिकांनी घेतल्याबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन संदीप लहाने पाटील विशाल लहाने पाटील, सूत्रसंचालन अनिल मोरे यांनी केले तर आभार बाळासाहेब भिसे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!