अर्जुन मेदनकर आळंदी,:
येथील आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ८ मधील हिंदवी कॉलनी, हॉटेल अतिथी मागील रहिवासी नागरिक यांचे सोयी साठी ६ इंची पिण्याचे पाण्याची पाईप लाईन टाकण्याची मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी केली आहे.
या मागणीसाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देऊन मागणी केली असल्याचे घुले यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ८ मधील हिंदवी कॉलनीत नागरिकांना पुरेशा प्रमाणात आणि उच्च दाबाने पिण्याचे पाणी मिळत नसल्याने गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. यामुळे पुरेशा प्रमाणात, नियमित आणि उच्च दाबाने पाणी मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांचे सोयीसाठी सहा इंची पिण्याचे पाण्याची पाईप लाईन हिंदवी कॉलनीत टाकल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. नागरी सेवा सुविधेस प्राधान्य देऊन पाईप लाईन टाकण्यात यावी यासाठी मुख्याधिकारी केंद्रे यांना निवेदन देण्यात आले असल्याचे घुले यांनी सांगितले.