अर्निका चॅरिटेबल ट्रस्टच्या वृक्षरोपणाने बहरले “आनंदवन ” हिरवेगार

118

अनिल चौधरी , पुणे

अर्निका चॅरिटेबल ट्रस्टच्या “एक झाड एक दीर्घायुष्य” संकल्पनेतून १०० विविध प्रकारच्या झाडांच्या वृक्षारोपणाचा प्राथमिक संकल्प करून कोंढव्यातील आनंदवन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्सहात पार पडला , अर्निका चॅरिटेबल ट्रस्टच्या वृक्षरोपणाने “आनंदवन ” बहरले असे यथे उपस्थित असलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

“ वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी,कांदा,मुळा,भाजी अवघी विठाई माझी.” संतानी किती आत्मीयतेने निसर्गाबद्दल,वृक्षांबद्दल लिहिले आहे.बहरलेला
निसर्ग कोणाला आवडत नाही? पानांची सळसळ,पक्षांचे मधुर गीत,झऱ्यांची खळखळ,धबधब्याचा घन गंभीर नाद,समुद्राच्या लाटांची गाज,निसर्गाचे हे रम्य रूप आपले सगळे दु:ख विसरायला लावते.म्हणूनच आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजेत.नव्हे नव्हे तर ती जगवली पाहिजेत.
सृष्टीच्या या चक्रामध्ये प्राणी आणि वनस्पती यांचे अतूट नाते आहे.दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत.प्राणी श्वास घेताना ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय आँक्साइड सोडतात तर झाडे कार्बन डाय आँक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात.अशा तऱ्हेने हवेतील घटकांचे प्रमाण कायम राहते आणि सर्व जीव सुखाने राहतात.कारण आता परिस्थिती बदलली आहे.पृथ्वीचा समतोल बिघडला आहे.निसर्ग चक्र उलटे फिरू लागले आहे.वातावरणात ऑक्सिजन चे प्रमाण घटून प्रदूषण वाढले आहे.त्यामुळे साथीचे रोग वाढले आहेत.आता पृथ्वीवर प्रचंड लोकसंख्या झाली आहे आणि अस्तित्वाच्या लढाईत एक प्रजाती दुसऱ्या प्रजातीवर हल्ला चढवीत आहेत.बळी तो कान पिळी ह्या न्यायाने मनुष्य जात सगळ्यांवर पुरून उरते आहे.मनुष्य हा असा एकच प्राणी आहे जो गरज नसतांना दुसऱ्या प्राण्याचा जीव घेतो.मग झाडे तर बिचारी मुकी असतात.त्यांना जीव असतो हे तरी आपल्याला ठाऊक आहे का?आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेणे ही आता अगदी सहज प्रवृत्ती झाली आहे असे यावेळी अर्निका च्या संचालिका डॉ रसिका लोणकर म्हणाल्या .
याप्रसंगी बोलताना निखिल लोणकर म्हणले कि, एक झाड पूर्ण वाढायला बरीच वर्षे जातात आणि आज काळाच्या प्रगत हत्यारांनी ते काही मिनिटात तोडता येतात.आपण अगोदरच निर्सगाचा खूप दुरुपयोग केला आहे,अजूनही वेळ गेलेली नाही,आज ही आपण आपल्या निसर्गाचे सौदर्य परत आणू शकतो.त्यामुळे आपण सर्वांनी झाडे लावून जगविण्याचे काम केले पाहिजे.कारण वृक्षारोपण काळाची गरज आहे.चला तर मग……. आपण पण शपथ घेऊया,झाडे लावूया…झाडे जगवूया….
यावेळी निखिल अनंता लोणकर , डॉक्टर रसिका निखिल लोणकर , पंढरीनाथ नाना लोणकर, दत्ता आबा लोणकर ,मनोहर लोणकर, संदीप नाना जगताप, दत्तात्रय गोते ,अनंता लोणकर, देवानंद लोणकर, समाधान कामठे ,रंजीत काळे, ऋषिकेश लोणकर ,ओम लोणकर नवनाथ गोते, यश देवकर , संजीवनी देवकर ,नेहा शेवाळे ,कांचन काकडे,अरुणा लोणकर , सुभद्रा लोणकर , ज्योस्त्ना लोणकर , उषा गोते , शोभा काळे ,रेवती लोणकर , श्रुती लोणकर , शुभम गोते ,उमेश दीक्षित ,सनी भंगे ,मनोज बाबर आदी उपस्थित होते. वृक्षारोपण झाले तर ह्या झाडांचे महत्त्व, अस्तित्व पुढच्या पिढीला कळू शकेल.पृथ्वीरक्षणाचा वारसा पुढच्या पिढीला समजावण्याचा यशश्वी प्रयत्न अर्निका चेरीटेबल ट्रस्टने केला.अधिराज काकडे , स्वस्ति कामठे , ऋग्वेद लोणकर आणि अर्निका लोणकर ह्या बालकानं वृक्षरोपण का कसे करायचे हे समझवण्यात आले .