नुकताच शिवसेना (उबाठा) पक्षाचा वर्धापन दिन मुंबईत साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हडपसर विधानसभेच्या कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याचे मा.आ. महादेव बाबर यांनी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना सांगितले .
आ. बाबर हे २००९ ते २०१४ ला हडपसर विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी हडपसर विधानसभा मतदार संघाचा कायापालट केला होता. त्यांनी रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावले होते त्यामळे नागरिकांनी त्यांना कार्यसम्राट हि उपाधी दिली होती. आपल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी कामांचा डोंगर आपल्या मतदार संघात उभा केला होता. यामुळेच स्व.बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वर बोलावून त्यांचा सत्कार केला होता. तसेच ते कायम आपल्या भाषणात आमदार असावा तर बाबर यांच्या सारखा त्यांनी विकास कामे करून शिवसेनेला अपेक्षित असणारा शिवसैनिक होत असा नेहमी उल्लेख करत.
आमदार बाबर यावेळी म्हणाले कि, आपण कधीही जाती पातीचे राजकारण केले नसून जात पात मला मान्य नाही मी सर्व धर्मियांसोबत असून प्रत्येक नागरिकांच्या मना मनात आपण आहोत. मुस्लिम मतदार देखील माझे समर्थक असून मी कधीही जाती पातीमध्ये भेद केला नाही. आज माझी उमेदवारी जाहीर होताच हडपसर मतदार संघातील नागरिकांना आपल्या घरातील तसेच कार्यसम्राट आमदार म्हणून आम्हाला बाबर पुन्हा आमदार पहायला मिळतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.दरम्यान हडपसर विधानसभा मतदार संघात महादेव बाबर यांनी कामाला सुरुवात केली असून ते प्रचंड मतांनी निवडून येतील असे अमोल हरपळे यांनी सांगितले
मा.आ. महादेव बाबर यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून हडपसर विधानसभेची उमेदवारी
RELATED ARTICLES