आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :
देहू देवस्थानचे माजी विश्वस्त, संत तुकाराम महाराजांचे १० वे वंशज,
महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, ‘आकाशा एवढा’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक, कीर्तनकार ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर यांचे वडील ह.भ.प. संभाजी महाराज मोरे देहुकर ( वय ७६ ) यांचे निधन झाले आहे. त्यांचे मागे आई, ,पत्नी, भाऊ, दोन मुले,एक मुलगी, सूना,नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या अंत्यविधी इंद्रायणी काठी, श्री क्षेत्र देहू या ठिकाणी शोकाकुल वातावरणात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत देहू येथे झाला. त्यांचे निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली.