पुणे : महाराष्ट्र आणि बंगाल यांचे ऐतिहासिक नाते आहे. लोकमान्य टिळक असो किंवा रविंद्रनाथ टागोर, योगी अरविंद घोष, गोपाळकृष्ण गोखले, सखाराम देऊस्कर यांच्यासारख्या अनेक दिग्ग्जांनी या संबंधांची पायाभरणी केली हे बंगाल मध्ये गेल्यावर प्रकर्षाने जानवते. महाराष्ट्र आणि बंगाल ही राज्ये एकत्रित येऊन कायमच संपूर्ण भारत देशाला दिशा दाखवत आली आहेत. मात्र हे संबंध मागच्या काही वर्षांत कमी झालेले दिसतात. एके काळी भारताच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीचे नेतृत्व या राज्यांनी केले आहे. याला उजाळा देण्यासाठी सरहद आणि वंदेमातरम् संघटना या संस्थांनी वंदेमातरम् गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुढाकार घेऊन “महाराष्ट्र बंगाल मैत्री पर्व” नावाचा उपक्रम सुरु केला आहे.
याचाच एक भाग म्हणून सोमवार 17 जून रोजी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे 25 युवक-युवती लेशपाल जवळगे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालकडे रवाना झाले होते.
19 जूनपासून 24 जूनपर्यंत 6 दिवस हा ग्रुप संपूर्ण बंगालमधील विविध सामाजिक, राजकीय, साहित्यिक तसेच शिक्षण, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भेटी घेऊन महाराष्ट्र आणि बंगालचे संबंधाना पूर्ववत करण्यासाठी काय पाऊले उचलायला हवीत याबद्दल चर्चा करत होता. पश्चिम बंगालमध्ये काम करणारे विविध मराठी अधिकारी आणि नागरिक यांच्याशीही संवादाची मोहीम या काळात राबविण्यात आली. तसेच ऋषीं बंकीमचंद्र चटर्जी यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन त्यांची 196 वी जयंती साजरी करणे, बंगालला महाराष्ट्राशी जोडणारे दुवा असणारे लोकमान्य टिळक व सखाराम देऊस्कर यांच्या कोलकत्यामधील पुतळ्यांना हार घालून अभिवादन करणे, शांतीनिकेतन आणि विविध क्रांतीकारक तसेच समाजसुधारकांशी संबंधित स्थळांना भेटी देणे इत्यादी कार्यक्रम करून हा ग्रुप 26 जून रोजी महाराष्ट्रात यशस्वीरित्या परतला.
प. बंगाल आणि महाराष्ट्रातील तरुणांना सोबत घेऊन या दोन राज्यांना एकत्र करण्याची लोकचळवळ उभी करणार असल्याची माहिती लेशपाल जवळगे, सत्यजित पवार, अभिषेक आहेर, उमेश वाघ, वैभव साळुंके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
Home
ताज्या घडामोडी महाराष्ट्र आणि बंगाल यांच्यातील संबंधांना उजाळा देण्यासाठी सरहद आणि वंदेमातरम् संघटना लोकचळवळ...