प्रशांत जगताप कोंढव्यातून फुंकणार विधानसभेचे रणशिंग…

501

हडपसरमध्ये खा.सुप्रिया सुळे, खा.डॉ.कोल्हे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन,

पुणे (प्रतिनिधी )
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे व शिरूर चे खासदार डॉ.अमोल कोल्हे लोकसभेवर चांगल्या मतांनी निवडून आल्याबद्दल हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने नागरी सत्कार होणार आहे, कोंढव्यात होणाऱ्या या सत्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप विधानसभेचे रणशिंग फुकणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या आहेत पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी साठी महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो,
हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तिन्ही पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे जागा वाटपात ही जागा कोणाच्या वाट्याला जाते यावर पुढची गणिते अवलंबून आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अनेक आमिष दिल्यानंतरही प्रशांत जगताप यांनी अजित पवारांसोबत न जाणे पसंत केले व शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी हडपसर मधून पक्की मानली जात आहे त्यातच प्रशांत जगताप यांनी पुणे शहरात एकाकी झुंज देत असतानाच बारामती लोकसभा व शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही खासदार निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, अजित पवार यांच्या समवेत माजी नगरसेवक व अनेक पदाधिकारी गेलेले असताना प्रशांत जगताप यांनी एकाकी किल्ला लढवीत शरदचंद्र पवार पक्षासोबत निष्ठा कायम ठेवली या त्यांच्या निष्ठेचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी होणार आहे.

वानवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना प्रशांत जगताप म्हणाले, मतदारसंघात खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, सुप्रिया सुळे व खा.अमोल कोल्हे यांचा नागरी सत्कार कोंढव्यात होणार आहे. हडपसर मतदारसंघ महाविकास आघाडी जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला यावी अशी मागणी केली आहे महाविकास आघाडीत कोणालाही उमेदवारी मिळाली त्याचे निष्ठेने काम करणार आहे, विधान परिषदेवर जाण्याचा संबंधच नाही विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातच नव्हे देश राज्यात एकच शरद पवार पॅटर्न…
अलीकडे हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हा मतदार संघ काँग्रेसला सुटावा अन्यथा सांगली पॅटर्न राबवणार असा इशारा दिला होता यावर बोलताना प्रशांत जगताप म्हणाले जिल्ह्यातच नव्हे राज्यातही एकच पॅटर्न चालतो तो म्हणजे शरद पवार पॅटर्न बाकीचे कोणतेही पॅटर्न चालत नाहीत.

हडपसर मतदारसंघात विकासकामे झालीच नाहीत…
माजी आमदार योगेश टिळेकर पाच वर्ष सत्तेत तर विद्यमान आमदार चेतन तुपे चार वर्षे सत्तेतील आमदार आहेत, मात्र कात्रज कोंढवा रस्ता उड्डाणपूलांची कामे व पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी एकही प्रश्न सोडवता आला नाही जनतेला आता मेट्रो व उड्डाणपुलाचे स्वप्न दाखवले जात आहेत मतदार नाराज होतील म्हणून लक्झरी बसेस चा मुद्दा हातात घेतला मतदार त्यांना आता घरचा रस्ता दाखवणार या शब्दात प्रशांत जगताप यांनी आमदारांवर टीका केली.

विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात ज्यांची विद्यमान जागा आहेत त्या पक्षाला जाणार असल्याने ही राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे वाट्या ला जागा येणार आहे, आमदार चेतन तुपे यांचा परत प्रवेश होऊ शकतो का यावर ते म्हणाले सर्व प्रयत्न करून झाले, नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाईट काळात त्रास देणाऱ्या आमदारांना बिलकुल प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
गेल्या दहा वर्षात भाजपच्या माध्यमातून पुणे शहरात बकालपणा वाढला आहे, ड्रग्ज संस्कृती आणली जात आहे, बहुमत असल्याने या सत्तेचा गैरवापर करण्यात आला त्यामुळे पुण्यामध्ये मोठे नागरी प्रश्न निर्माण झाले आहेत, महाविकास आघाडी राज्यात पुन्हा सत्तेवर येणार व महायुती सत्तेतून पायउतार होणार असे प्रशांत जगताप आवर्जून म्हणाले.