पुणे प्रतिनिधी
पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सवाच्या 2024 / 2025 अध्यक्षपदी अनिल मोरे तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र कोंडे यांची निवड करण्यात आली. आज झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत सर्वांनुमते निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भिसे, कार्याध्यक्ष शैलेश नवले, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, माजी अध्यक्ष हेमंत ढमढेरे, सुमंत तुपे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 2024 / 2025 कार्यकारिणी नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारणी मध्ये अध्यक्ष अनिल मोरे कार्याध्यक्ष राजेंद्र कोंडे, वरिष्ठ उपाध्यक्ष अमर चौधरी, राजू नालबंद, उपाध्यक्ष राजाभाऊ डांगमाळी, तुषार पायगुडे, दयानंद राऊत, सेक्रेटरी अभिजीत ससाणे, सह सेक्रेटरी संतोष हिंगणे, खजिनदार प्रवीण टिळेकर, अशोक राऊत, शक्तिपीठ पुरस्कार संयोजन समिती अध्यक्ष हेमंत ढमढेरे तर महिला अध्यक्षपदी कैवल शिंदे उपाध्यक्ष सविता चौधरी, भारती तुपे यांची निवड करण्यात आली.
मागील वर्षी हडपसर नवरात्र महोत्सवात साडेतीन शक्तीपीठ भव्य देखावा करण्यात आला होता, हजारो भाविक भक्तांनी या ठिकाणी भेट दिली यावर्षी भव्यदिव्य धार्मिक ऐतिहासिक देखावा केला जाणार असून हडपसर पंचक्रोशातील भाविकांसाठी एक पर्वणी असणार आहे. नवरात्री महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे.
अनिल मोरे
नवनिर्वाचित अध्यक्ष – पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सव समिती