अनिल चौधरी पुणे
स्वराष्टक ग्रुप तर्फे जुन्या ऐंशी व नव्वदीच्या दशकातील गाण्यांचा कार्यक्रम पुण्यातील यंशवंतराव चव्हाण नाटयगृह येथे पार पडला. यामध्ये डॉ सुजित जोशी यांनी सुमधुर गायिलेल्या गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याचे पहावयास मिळाले. एकशे एक गाणी व तितक्याच धडाक्यात सर्व कलाकारांनी गायिलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांनी नाट्यगृह अगदी डोक्यावर घेतले होते. वांरवार लोकांचे वन्समोयर मिळत होते.
यावेळी माध्यमांशी सवांद साधताना डॉ जोशी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील असून आपले व्यवसाय सांभाळून हि कलेची जोड जोपासत आहोत. आम्ही आठ जण आहोत. आतापर्यंत दहा शो केले आहेत. लाईव्ह म्युझिक तसेच इतर कलाकारांना आम्ही संधी देत आहोत . सर्वांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी डॉ. सुजित जोशी, रेवती सुपेकर, अस्मिता साने, भूषण जोशी, अद्वैत पाटणकर, गायत्री दीक्षित, रोहित काळे, अश्विनी मोडक यांनी देखील अप्रतिम गायन या प्रसंगी केले