अनिल चौधरी , पुणे
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे वाक्य आपल्याला माहित असेलच. आई ही अशी व्यक्ती आहे जिचे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही. त्याचबरोबर,आईचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे सांगायचं झालं तर शब्दांची कमतरता जाणवू लागते.आईचा वाढदिवस असेल तर तो खास झालाच पाहिजे. हिच कास धरून डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड संस्थेतर्फे विविध उपक्रमांनी एम एस आर डी चे आयुक्त डॉ अनिल कुमार गायकवाड यांच्या मातोश्री वत्सलाबाई बळीराम गायकवाड यांचा ८४ वा वाढदिवस पुण्यातील मातोश्री वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांना सुग्रास जेवण देऊन करण्यात आला तसेच त्यांना भेट वस्तू देऊन उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी सेवाकुंड संस्थेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
डॉ अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड संस्था नेहमीच सामाजिक उपक्रम राबबवीत असते. या उपक्रमांद्वारे समाजातील गोर गरीब कष्टकरी नागरिकांना नेहमीच मदत करत असतात.
गायकवाड यांचे चिरंजीव अश्वजीत भैया गायकवाड यांचा देखील वाढदिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. त्यांचा वाढदिवसाचा खर्च टाळून सेवाकुंड संस्थेतर्फे वाराणशी येथील गंगाघाट येथे स्वच्छता अभियान राबवून घाट तसेच गंगा नदीची स्वच्छता करण्यात आली.
तसेच येथे देखील मोफत अन्नदान करण्यात आले. प्रयागराज येथे गंगा स्नान करण्यास आलेल्या नागरिकांना तसेच साधूंना यावेळी बॅग चे वाटप करण्यात आले.
एम एस आर डी चे आयुक्त डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी प्रयागराज येथे पवित्र स्नान केले .
तसेच प्रयागराज येथे आहोरात्र काम करणारे सफाई कर्मचारी यांचा सत्कार करून ते करत असलेल्या कामांप्रती कृतद्न्यता म्हणून त्यांचे आभार देखील मानण्यात आले. तसेच पुण्यातील हिरालाल सराफ शाळेतील विध्यार्थाना गणवेश चे देखील वाटप करण्यात आले..