अनिल चौधरी पुणे
तब्ब्ल १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडाळाचे आयुक्त डॉ. अनिल कुमार गायकवाड यांनी प्रयागराज येथील महाकुंभाला भेट देताना त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. यावेळी त्यांनी महामंडलेश्वर तसेच विविध आखाड्यांचे पीठाधीश साधू संत यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद देखील घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना चांगले दिवस येऊन पाऊस ,पाणी, पीके तसेच राज्यातील जनतेला सुखी ठेवण्याची मागणी माता गंगा कडे केली. यावेळी त्यांनी प्रमुख बडे हनुमान मंदिरात प्रार्थना देखील केली.
संगम हे पवित्र नद्या गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचे संगम मानले जाते, ज्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सध्या सुरू असलेल्या महाकुंभ उत्सवाचा भाग म्हणून संगमात स्नान केले आहे. तसेच राष्ट्रपती मुर्मू यांनी देखील महाकुंभास भेट देत औपचारिक स्नान केले.