अनिल चौधरी, पुणे
पुण्यातील ससून हॉस्पिटल परिसरामध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात यावे अशी मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी विधानभवनातील सभागृहात केली आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा २०१२ साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक वैद्यकीय विभागाला हस्तांतरित करावी असा निर्णय झाला होता.यावेळी ही सदर जागा ससून हॉस्पिटल ने कॅन्सर रुग्णालय उभे करण्यासाठी वापरावी असे निर्देशित केले. त्याप्रमाणे ससून जवळील जागा हस्तांतरणासाठी ससून चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी प्रयत्न करावा व सदर ३५० कोटींचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठववा असेही निर्देशित करण्यात आले होते. परंतू ही जागा एका खाजगी बिल्डर ला ७० कोटी रुपयांत भाडे तत्त्वावर देण्यात आली आहे. तेथील जागा लवकरात लवकर शासनाला पुन्हा हस्तांतरित करावी व या जागेवर कॅन्सर रुग्णालय उभे करावे अशी शासनाला सभागृहात विनंती आमदार टिळेकर यांनी केली.