डेटा सायन्सच्या प्रभावी वापरातून समाजात सकारात्मक बदल घडवता येतात – रोहिणी श्रीवत्स

964

अनिल चौधरी,पुणे 

गेल्या दशकात डेटा सायन्सचे क्षेत्र सर्वव्यापी झाले असल्याने मानव आणि मशीन यांच्यातील नाते आता बदलत आहे. डेटा सायन्सच्या प्रभावी वापरातून आपल्याला संस्था, कंपनी, व्यापार आणि परिणामी समाजात सकारात्मक बदल घडवता येतात, असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सी.टी.ओ. रोहिणी श्रीवत्स यांनी शानिवारी केले.

  स्टॅन्फोर्ड विद्यापीठाच्या पुढाकारातून आयोजित ‘विमेन इन डेटा सायन्स’ या परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महिला उद्योजिका आणि ‘विमेन इन डेटा सायन्स’च्या पुणे अॅम्बेसिडर सुचेता ढेरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शास्त्रज्ञ उपस्थित होते.रोहिणी श्रीवत्स म्हणाल्या, “डेटा सायन्स मध्ये आज मोठ्या संधी उपलब्ध आहेत, मी कॉलेजमध्ये असताना गणिताची मला प्रचंड आवड होती त्यातून मला या विषयाचे महत्व कळत गेले. आज जगभरात जवळपास ८० टक्क्याहून अधिक लोक माहितीच्या प्रचार आणि प्रसारापासून दूर आहेत. त्यामुळे अशा लोकांना माहितीच्या प्रभावाखाली आणण्यासाठी डेटा सायन्सचा प्रसार करणे आवश्यक आहे.                                                    ”‘विविध क्षेत्रात डेटा सायन्सचे असणारे महत्व आणि संधी’ हा या परिषदेचा मुख्य विषय होता. या परिषदेत फॅशनबद्दल डॉ. मानसी पटवर्धन, जाहिरात क्षेत्राविषयी झी5 च्या उज्जयिनी मित्रा, उबरच्या विद्या डूथलुरू, झोमॅटोच्या निकिता मल्होत्रा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल डॉ. सीमा सिंग यांनी मार्गदर्शन केले..                                                 या एका दिवशीय डेटा सायन्स परिषदेचे प्रमुख वैशिष्टे म्हणजे या ठिकाणी फेस रिकग्निशन, व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्डस् – बॅच अशा अद्ययावत तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके करण्यात आली.. मूड ब्यॅरामिटर संकल्पनेनुसार रियल टाईम फीडबॅक घेण्यात आला. लेगो गेम्स वापरून संख्याशास्त्र संकल्पना शिकवण्यात आले. तसेच प्रश्नमंजुषा घेण्यात आली. डेटा सायन्सच्या शिक्षणासाठी मोफत ऑनलाईन कोर्सेसची गिफ्ट व्हाऊचर देण्यात आली. या परिषदेत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण, डेटा शास्त्रज्ञ, डेव्हलपर्स आणि इंजिनिअर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.