नवी मुंबई परिसरातील सिडको अंतर्गत गावे, शासकीय नळजोडण्यांसाठी अभय योजना मंजूर

843

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळ जोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करुन, मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व 6महिने कालावधीमध्ये भरण्याची‘अभय योजना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे.
सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळ जोडणी धारक यांच्याकडील थकित पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत होती. यामध्ये काही ग्राहकांकडून थकित रक्कम सिडकोकडे जमा देखील झाली आहे.मात्र अद्यापही काही थकबाकीदारांनी रक्कम भरलेली नाही.नवी मुंबईतील नवीन पनवेल, काळुंद्रे,कळंबोली, नावडे,करंजाडे,कामोठे, खारघर,द्रोणागिरी,उलवे तसेच आजुबाजूची गावे मिळून मार्च2018अखेर 86कोटी80लाख रुपये थकित आहेत.पैकी ग्रामपंचायत व सरकारी कार्यालयांकडे यातील42 कोटी61लाखांची रक्कम थकित आहे.पैकी16 कोटी 78 लाखांची रक्कम ही विलंब शुल्क आहे.तर 25कोटी83लाख रुपये ही मूळ रक्कम आहे.
दरम्यान,थकित रक्कम भरताना विलंब शुल्क माफ करण्यात यावे,अशी मागणी काही ग्रामपंचायत व सरकारी कार्यालयांनी केली आहे.त्यानुसार सिडको संचालक मंडळाने प्रस्ताव तयार करुन त्यास मान्यता दिली आहे.हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.
0 0 0

जय महाराष्ट्र’ मध्ये ‘हिवरेबाजार समृध्द गाव’
या विषयावर सरपंच पोपटराव पवार यांची मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ‘हिवरेबाजार समृध्द गाव’ या विषयावर हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार,दिनांक28मे रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30वाजता प्रसारित होणार आहे.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील आधीचे आणि आताचे हिवरे बाजार,गावात गेल्या तीस वर्षात झालेले बदल,ग्रामविकासाचा आराखडा,विकास योजना राबविण्यासाठी‍ गावकऱ्याचे केलेले मतपरिवर्तन,गावच्या विकासाकरिता मिळालेली प्रेरणा,गावात मे महिन्यातही पाण्याची कमतरता जाणवत नाही त्याची कारणे आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००

मुख्यमंत्री/गोसीखुर्द प्रकल्प

रस्ते,रेल्वे,मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा गोसीखुर्द लघु सिंचन प्रकल्प 2020 पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोसीखुर्द लघु सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या घेवून प्रकल्पाचे काम 2020पर्यंत पूर्ण करण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रालयात आज रस्ते, रेल्वे,मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आढावा घेतला.यावेळी विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
मेट्रो मार्ग-2बी,3,4,4ए, 5,6या मार्गाचे119 किमीचे काम तसेच अतिरिक्त169किमी मार्गिकेचे काम2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वर्धा-नागपूर आणि अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल.मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)यांनी कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.मेट्रो मार्ग क्र.7 अंधेरी-दहिसर हा मार्ग विकसीत करण्यासाठी जमिनीचे हस्तांतरण करणे,तसेच मेट्रो मार्ग क्र.4वडाळा ते कासरवडवली विकसीत करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो महामार्ग विकसीत करण्यासाठी तंत्रनिकेतनाची5.76 हेक्टर जमीन तसेच ग्रामीण भागातील4 हेक्टर आणि बाळेवाडीतील4हेक्टर जमीन विकसीत करण्यात येणार आहे.पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करण्यासाठी पीएमसी ला जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो मार्ग–3 कुलाबा ते बांद्रा,सिप्झ कॉरिडॉर,नागपूर मेट्रो, मोनोरेल,मेट्रो मार्ग4ए, मेट्रो मार्ग-6समर्थ नगर ते विक्रोळी,मेट्रो मार्ग-7 अंधेरी ते दहिसर, मेट्रो मार्ग2बी डी.एन नगर ते मंदाले,मेट्रो मार्ग क्र.2ए दहिसर पूर्व ते डी.एन नगर तसेच भेंडीबाजार पुनर्विकास या विषयावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता,मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर,कृषी विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी,नगरविकासच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर,वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,’म्हाडा’चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
००००
बारावी निकाल/संकेतस्थळावर बारावीचा आज निकाल चार अधिकृत संकेतस्थळावर

फेब्रुवारी- मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 28 मे रोजी जाहीर होणार आहे. पुणे,नागपूर,औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती,नाशिक,लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळाअंतर्गत बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
www.mahresult.nic.in,www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, आणि www.maharashtra12.jagranjosh.com या संकेतस्थळावर मिळेल. सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण सदर संकेतस्थळावर दिसतील तसेच याची प्रिंटआऊटही घेता येईल.याशिवाय बारावीचा निकाल एसएमएस सेवेद्वारेही मोबाईल फोनवरुन मोबाईल ऑपरेटरद्वारे उपलब्ध होतील. MHHSC<space> <seat no> असा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठविल्यास विद्यार्थ्यांना कळू शकेल.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळेल.तर www.mahahsscboard.maharashtra.gov.in आणि www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल मिळेल.
ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून,यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
बारावीची पुरवणी परीक्षा मागील वर्षाप्रमाणेच जुलै- ऑगस्ट2019मध्ये घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.