धडगाव ग्रामीण रुग्णालयात मद्यपीचा धिंगाणा

1004

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

दिनांक 8 जुन रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत व्यक्तीने ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे डॉक्टरांना व रुग्णालयातील परिचारिकाना शीविगाळ केली तसेच अंगावर धावून आले तसेच धडगाव ग्रामीण रुग्णालयातील खिडकीच्या काचा फोडल्या व प्रसूती विभागामध्ये जाऊन रुग्णांशी वादविवाद केला या सर्व घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांना लेखी स्वरूपात तक्रार देऊनही तसेच हा पोलिसांसमोर सर्व प्रकार होऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही व त्यावर कोणतीही कार्यवाही न करता तसेच सोडण्यात आले आहे तसेच सदर मद्यपीने ग्रामीण रुग्णालय चालू देणार नसल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्यामळे धडगाव ग्रामीण रुग्णालय रात्री बंद करण्यात आले होते रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय वळवी यांच्यासह परिचारिका ओमिता पाडावी व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी धडगाव रुग्णालयात धिंगाणा घालणाऱ्या इसमा विरोधात धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येऊन देखील अद्याप आरोपी अटक करण्यात आली नाही