कोंढवा ब्रुद्रुक मध्ये मुख्य मार्गावर साचले पाणी

884

मल्हार न्यूज ,ऑनलाईन पुणे

कोंढवा बुद्रुक हा परिसर पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन दोन दशके झाली असतील तरीही गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या, साफसफाई, रस्ते अशा अनेक समस्या आहेत.मात्र अंतर्गत राजकारण आणि नियोजन शून्य कारभारामुळे गावात म्हणावे  तशी विकासकामे नाहीत.अशात पावसाळ्यात मुख्य मार्गावर पाण्याचे तळे साचलेले पहायला मिळत आहे.

  एका बाजूला कोंढवा बृदुक गावामध्ये जाणारा मुख्य रस्ता तर दुसऱ्या बाजूला जाणारा व्हीआयटी कॉलेजला, बिबवेवाडी, अप्पर तसेच मार्केटयार्ड मार्गे पुणे शहरात जाणारा अत्यंत रहदारीचा रस्ता. याच रस्त्यावरून चालणारे वयोवृद्ध जेष्ठ, नागरिक ,शाळेतील लहान मुले, महिला. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून जागोजागी चिखल व गटारे साचलेली आहेत. याची तक्रार पुणे मनपा कडे करून सुद्धा अधिकारी लक्ष देत नाहीत. शाळकरी विद्यार्थ्यांना या मार्गावरून शाळेत जाणे आणि येताना गणवेशावर रस्तायावरील घाण पाणी उडते.तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाचे युवा नेते दिपक कामठे म्हणाले, आम्ही मनपाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असून ते लवकरच यावर उपाययोजना करतील. तसेच कोंढवा ब्रुद्रुक प्रभागातील ज्या ज्या ठिकाणी पाणी साचत आहे , त्या त्या ठिकाणी पालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील दिपक कामठे यांनी केली आहे.