माणुसकी फाउंडेशनच्या वतीने बांदोरवाला लेप्रसी हॉस्पिटल मध्ये झेंडा वंदन

692

पुणे प्रतिनिधी,

स्वातंत्र्य दिनानिमित्तमाणुसकी फाउंडेशनच्यावतीने बांदोरवाला लेप्रसी हॉस्पिटल(येवलेवाडी) येथे झेंडा वंदन करण्यात आले.फाऊंडेशनचे अध्यक्ष रो.डॉ.राजेंद्र भवाळकर यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.या प्रसंगी राजेंद्र भवाळकर(अध्यक्ष),सुहास चव्हाण(खजिनदार),प्राची कोकणे(प्रोजेक्ट डायरेक्टर),शिला डावरे(देशातील पहिली महिला रिक्शा चालक),बांदोरवाला रुग्णालयाच्या प्रशासक मीरा भोये,डॉ.शहा,आदि मान्यवरांच्या बरोबरच कुष्ठरुग्ण बांधव व सेवकवर्ग उपस्थित होता.या प्रसंगी बोलताना राजेंद्र भवाळकर यांनी देशसेवा म्हणजे कुठे दुसरीकडे जावून करायची सेवा नाही तर आपले काम उत्तमरीतीने करणे ही सुद्धा देशसेवाच आहे असे संगितले.मिठाई वाटप व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.