दोन गटातील मतभेदाला पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या सकारात्मक विचारांनी पूर्णविराम….

1390

गणेश जाधव, पुणे 

कोंढवा येथे असलेल्या ब्रह्मामॅजेस्टिक सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी दोन गटात जातीय तेढ निर्माण झाला होता .या जातीय तेढामुळे सामाजिक वातावरण दूषित झाले याबाबतची तक्रार कोंढवा पोलिस स्टेशनला प्राप्त होताच कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः लक्ष घातले.

कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले .दोन्ही गटातील वरिष्ठ ,समंजस व्यक्तींना संपर्क करून त्यांनी वारंवार बैठका घेतल्या ,अनेक वेळा अनौपचारिकरीत्या सोसायटीला भेट देऊन तेथील रहिवाशांमध्ये एक जातीय सलोखा ,बंधुप्रेम यांचे धडे दिले याचे फलित म्हणून रहिवाशांमध्ये मतपरिवर्तन होऊन दोन्ही गटांनी आपण सर्वजण एक आहोत याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले.

आपापसातील मतभेद विसरून प्रत्येक सण-उत्सव तेवढ्यात जोशात आणि उत्साहात आमच्या सोसायटीमध्ये आम्ही साजरा करू याची ग्वाही ब्रह्मा मॅजेस्टिक सोसायटीचे चेअरमन जयसिंग परदेशी यांनी दिली .
आमच्या दोन्ही गटातील मतभेद पोलिसांच्या सहकार्याने सुटला असून आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहू असे असे सादिक भाई यांनी व्यक्त केले.

कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी ब्रह्मा मॅजेस्टिक सोसायटीच्या रहिवाशांनी पुष्पगुच्छ देऊन सकारात्मक विचारांचा सत्कार केला .याप्रसंगी बोलताना ते म्हणाले ,पोलीस फक्त कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचेच काम करत नाही तर समाजामध्ये धार्मिक एकता ,जातीय सलोखा, बंधुभाव कसा रुजला जाईल याकडे देखील विचार केला जातो याचेच हे फलित आहे असे मत त्यांनी व्यक्त केले ..

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते  मा. नगरसेवक तानाजी लोणकर, कमलेश भाई ,गोस्वामी ,सादिक भाई ,कोमल थडानी ,अर्चना काळे रितिका ,धरमदसानी ,दीपिका ,नर्सिंग ,विद्या, आसिफ शेख मतीन शेख ,सादिक भाई उपस्थित होते…

समाजामध्ये एक पूरक वातावरण तयार करण्याचे काम कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी केले आहे असे मत तेथील रहिवाशांनी व्यक्त केले..

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन दोन्ही समाजात एकोपा निर्माण केला, त्यांच्यासोबत कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आनंद धनगर , ASI शेख, विशेष शाखेचे जाधव यांनी मेहनत घेऊन सर्व धर्मीयांचे सण मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे सोसायटीमधील नागरिकांनी जाहीर केले.