टिपिकल अॅक्शनपट “साहो”

789

भूपाल पंडित, चित्रपट समीक्षक ,पुणे

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास तब्बल दोन वर्षांनंतर बहुप्रतीक्षित, बहुचर्चित ‘साहो’ या चित्रपटातून त्याच्या चहात्यांच्या भेटीला आला आहे. सुजिथ दिग्दर्शित हा चित्रपट फुल्ल अॅक्शनने भरलेला असला तरी कथेमध्ये फारसे नावीन्य नसल्याने फारसा प्रभावी वाटत नाही.

‘साहो’ ही गोष्ट आहे एका भल्यामोठय़ा चोरीची. तब्बल दोन हजार कोटींची चोरी होते. संपूर्ण पोलिस यंत्रणा या चोरीचा शोध घेण्यासाठी कामाला लागते मात्र हाती काहीच लागत नाही. अखेर ही केस अंदरकव्हर पोळीसा अधिकारी अशोक श्रीवास्ताव (प्रभास) कडे सोपवण्याचा निर्णय होतो. त्याचे एंट्री झाल्या नंतर हा सर्व पैसा एका कंपनीचा असून त्यामागे मोठी गुन्हेगार मंडळी असल्याचे समोर येते, तसेच एका ब्लॅक बॉक्सच शोधा सूरू असल्याचे समोर येते. चोरी शाडो (नील नितिन मुकेश) करत असल्याचे समोर आल्यावर अशोक आणि अमृता (श्रद्धा कपूर ) त्याला पकडण्यासाठी टीम तयार करतात, पुढे नक्की होते हे जाणून घेण्यासाठी ‘साहो’ चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा.

सुजिथ दिग्दर्शित या चित्रपटात ऍक्शन दृश्य एवढी जास्त आहेत की, ती बाजूला करून त्यातून कथा शोधावी लागते आणि जे काही कथेचे थोडेबहुत तुकडे दिसतात तेदेखील इतके दुबळे आहेत. पटकथा विस्कळीत आहे आणि संवाद प्रभाव पाडत नाहीत. नको तिथे विनोदी दृश्यं अजिबात प्रभावी वाटत नाहीत,. त्यात अनेक व्हिलनची फळी तयार करताना व्यक्तिरेखा खास प्रभावी वाटतच नाहीत.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर चित्रपटातील प्रभास एखाद्या सुपरहिरोपेक्षा कमी नाही. कारण अगदी काही फुटांवरून गुंड त्याच्यावर गोळी झाडत असतात पण तरीही त्याला काहीच होत नाही. काही दृश्ये या चित्रपटांमध्ये का? आहेत असाही प्रश्न वारंवार पडतो. इथे तर्क लावायचा प्रयत्न जरी केला तरी उत्तर सापडणार नाही. प्रभास त्याच्या स्टाइलसाठी सर्वाधिक ओळखला जातो. त्यामुळे चित्रपटात त्याच्या कपड्यांवर फार खर्च करण्यात आला आहे. श्रद्धा कपूर खूपच फिकी वाटते. म्हणजे प्रभासच्या वेगवान भूमिकेला अचानक करकचून ब्रेक लागल्यासारखी तिची भूमिका गचके घेताना दिसते. अर्थात ग्लॅमरस दिसण्याबाबत ती एक नंबर आहे. या सिनेमातही ग्लॅमरस लुकमध्ये कुठेही कमतरता नाही. पण त्याचा भूमिकेला काही फायदा होत नाही. तिची भूमिका नीट लिहिली गेली असती तर सिनेमाला भक्कम आधार मिळाला असता.  व्हिलनमध्ये चंकी पांडे आवडून जातो. त्याची व्यक्तिरेखा जमून आली आहे. बाकी फक्त व्हिलनचा भरणा आहे. 

‘साहो मध्ये ऍक्शन दृश्य रंगतात. छायांकनदेखील बरी साथ देतं. तसंच ग्राफिक्सदेखील मस्त जमले आहेत, पण गाणी मात्र उगाचच जागा भरतायत असं वाटत राहतं. मध्यांतर व्हायच्या आधी प्रेक्षक म्हणून आपला एकूणच उत्साह ओसरला असतो. त्यामुळे अपेक्षा नसताना मध्यांतरानंतर काही वेळ बरा जातो. पण नंतर ही गाडी पुन्हा घसरते आणि मग मात्र ती सावरतच नाही.

थोडक्यात सांगायचे तर ३५० कोटी रुपये खर्चून केलेला ‘साहो’ हा चित्रपट प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यात बहुतांशी अपयशी ठरला आहे यामुळे तुमच्या डोक्यात प्रभासचा ‘बाहुबली’ असेल ‘साहो’ तुमची अगदीच निराशा करेल. जर ऍक्शनवर खूप जास्त प्रेम असेल आणि  प्रभासचे चाहते असाल तरच ‘साहो’च्या वाट्याला जा.

चित्रपट – साहो

निर्मिती – वामसी कृष्णन रेड्डी, प्रमोद उपल्पट्टी, भूषण कुमार

दिग्दर्शक – सुजिथ

संगीत – शंकर – एहसान – लॉय , तनिष्क बागची,

कलाकार – प्रभास, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, मुरली शर्मा, चंकी पांडे, मंदीरा बेदी, अरुण विजय

रेटींग – 2.5

–    भूपाल पंडित

pbhupal358@gmail.com