Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेमंगळसूत्रांची चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांकडून 8 गुन्हे उघडकीस; येरवडा पोलिसांची कामगिरी

मंगळसूत्रांची चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांकडून 8 गुन्हे उघडकीस; येरवडा पोलिसांची कामगिरी

भूषण गरुड ,

फिर्यादी सपना कोठारी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचा येरवडा पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलिस अधिकारी तपास करत असताना, मिळालेल्या माहितीच्या आधारे 2 सराईत आरोपींना अटक करत 8 गुन्हे उघडकीस आणत 3 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.मंगळसूत्रांची चोरी करणाऱ्या सराईत आरोपी शकील शब्बीर शेख उर्फ काकड्या (वय 20) समीर शब्बीर शेख (वय 22), दोघे राहणार. साठे वस्ती, लोहगाव, पुणे) यांना अटक करण्यात आली. येरवडा परिसरात आरोपींनी 8 गुन्हे केल्याची कबूली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सपना कोठारी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपासादरम्यान येरवडा पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी 1)शकील शब्बीर शेख उर्फ काकड्या (वय – 20), 2) समीर शब्बीर शेख (वय – 22, दोघे राहणार. साठे वस्ती, लोहगाव, पुणे) यांना सापळा रचून अटक करत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली देत येरवडा भागात आणखीन 8 गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून आठ गुन्हे उघडकीस आणत. आरोपीकडून चोरीच्या 5 दुचाकी, 1 चांदीची चेन, 1 सोन्याचे मंगळसूत्र, 2 चोरीचे मोबाईल, 5 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 03, 05, 000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगिरी,अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 प्रसाद अक्कनवरू, सहा.पोलीस आयुक्त येरवडा विभाग रामचंद्र, येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे पोलीस उप.निरीक्षक मंगेश भांगे, स.पो.फो बाळासाहेब बहिरट, पोलीस हवालदार हनुमंत जाधव, पो. ना शरद बांगर, मनोज कुदळे, अशोक गवळी, कानिफनाथ कारखेले, सुनील नागनाथ, अजय पडोळे, राहुल परदेशी, समीर बोरडे, नवनाथ मोहिते ,विष्णू सरोदे, पंकज मुसळे ,नागेश कुवर , सुनील सकट यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!