अपघातातील मयत व्यक्तींच्या वारसांना मदतीचे धनादेश वाटप

816

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील अपघातात मयत झालेल्या मयताच्या वारसांना काल मंगळवारी आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते पालिकेच्या जनता अपघात विमा योजना अंतर्गत1लाख रुपयांचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
नंदुरबार नगरपालिके तर्फे शहरातील सर्व मतदारांचा जनता अपघात विमा योजना अंतर्गत विमा काढण्यात आला आहे या योजनेत शहरातील मतदार अपघातात मयत झाल्यास त्याच्या वारसांना मदत म्हणून एक लाख रुपये दिले जातात दरम्यान दि27-9-2018 रोजी प्रभाग क्रमांक18मधील रहिवासी सुभाष परशुराम ओतारी यांचा अपघातात मरण आले सौ.रत्ना रघुवंशी व पालिका मुख्याधिकारी यांचे कडे मयतांच्या वारसांना अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा केला प्रस्तावासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केल्याने मयतांचे वारस आई जयवंता परशुराम ओतारी व पत्नी रेखाबाई सुभाष ओतारी यांना आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते एक लाखाचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यासाठी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी,उपनगराध्यक्ष परवेज खान,बांधकाम सभापती कुणाल वसावे,सभापती कैलास पाटील, सभापती सौ.जाग्रती संजय सोनार,सभापती शारदाबाई ढंडोरे,सभापती सौ.मनिषा चेतन वळवी यांचे सहकार्य लाभले.