कोंढवा प्रतिनिधी,
कोंढवा भागातील शिवनेरीनगर मधील आमदार योगेश टिळेकर यांच्या विकास निधीतून अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे 35 लाख रुपयांच्या कामांचे भूमीपूजनाचा कार्यक्रम आमदार योगेश टिळेकर तसेच कोंढवा भागातील जेष्ठ नागरिक, शिवसेना , आरपीआय चे कार्यकर्ते यांच्या हस्ते आज शिवनेरी नगर येथील विठ्ठल मंदिराजवळ संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार टिळेकर म्हणाले, मी हडपसर विधानसभा मतदार संघाचा विकास केला असून या मतदार संघाने आतापर्यंत पाहिला नसेल असा विकास या ठिकाणी केला आहे. विविध ठिकाणी नागरिक मागतील तेथे रस्त्यांची कामे केली आहेत. कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. कात्रज चौकातील सहा पदरी उड्डाणपूलाचे काम लवकरच सुरू होणार आहे.या मतदार संघात सर्वात जास्त विकास निधी खर्च झाला असून हडपसर विधानसभा मतदार संघ हा खऱ्या अर्थाने विकास पूर्वक झाल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी अमर गव्हाणे, महेंद्र गव्हाणे, मदन शिंदे, दिनेश गव्हाणे, हभप रावडे, हभप महाले, अनंता लोणकर, सचिन कापरे,शंकर लोणकर, इसाक पानसरे, दर्शन किराड,बाबा शेख, अजहर,संदीप लोणकर, किशोर लोणकर, अशोक दुबे तसेच नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.