पुणे प्रतिनिधी
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि अजिक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अजिक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, पुणे येथे Tourism and Jobs – Better Future for all या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
सदरच्या चर्चा सत्रामध्ये पर्यटन विषयातील तज्ञ आणि अजिक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या हॉटेल मॅनेजमेंट संस्थेच्या विद्यार्थ्यानी भाग घेतला. याप्रसंगी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे, पर्यटन संचालनालयाच्या उप संचालक श्रीमती सुप्रिया करमरकर, अजिक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, पुणे चे विभाग प्रमुख डॉ. श्री. संदीप तापकिर, ॲमानोरा फर्न हॉटेल यांचे महाव्यवस्थापक श्र. अमित शर्मा आणि कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी, हरियाणाच्या डीन श्रीमती मंजुला चौधरी हे पर्यटन विषयातील तज्ञ उपस्थित होते.
चर्चासत्राच्या माध्यमातुन पर्यटन क्षेत्रातील नवीन संधी, उपलब्ध रोजगार आणि पर्यटन क्षेत्राचा विकास या विषयावर चर्चा करण्यात आली. अजिक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या हॉटेल मॅनेजमेंट संस्थेच्या विद्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नांची तज्ञांनी सयुक्तिक आणि समग्र माहीती देण्यात आली. विद्यार्थ्यांना सदरच्या चर्चासत्रामुळे पर्यटन विषयाची माहीती, विस्तार आणि नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधीची सविस्तर माहीती मिळाली. पर्यटन क्षेत्रातील नव्याने येत असलेले तंत्रज्ञान आणि शाश्वत पर्यटनाचा अंगिकार करून पर्यटन क्षेत्रात मोठी मजल मारता येणार असल्याचे तज्ञांनी विशद केले. अजिक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी, पुणे चे विभाग प्रमुख डॉ. श्री. संदीप तापकिर यांनी उपस्थितांचे आभार मानुन चर्चासत्राचा समारोप केला. जागतिक पर्यटन दिन आणि महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन संचालनालय, पुणे यांच्या माध्यमातुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.