पुणे प्रतिनिधी
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले.
यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, एअर कमोडोर राहूल भसीन, मेजर जनरल नवनीत कुमार, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, यांनी उपराष्ट्रपती महोदय यांचे स्वागत केले.
पुण्यभूषण पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहण्यासाठी उपराष्ट्रपती महोदय यांचे पुण्यात आगमन झाले आहे.
0000000