Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेकायदा व सुव्यवस्थेसह निवडणूक तयारीचा निवडणूक आयोगाने घेतला आढावा

कायदा व सुव्यवस्थेसह निवडणूक तयारीचा निवडणूक आयोगाने घेतला आढावा

पुणे प्रतिनिधी:-

– विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी आज पुणे विभागातील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
यशदा येथे पुणे विभागातील पुण्यासह सोलापूर, सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सह जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
श्री सिन्हा म्हणाले, मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर खात्रीशीर किमान सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचीही विशेष काळजी घेतली जावी. मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, मतदार यादीतील क्रमांक याची माहिती वेळेपूर्वी मिळेल, याची दक्षता घेतली जावी, मतदारांना मतदार चिठ्ठया वेळेपूर्वी उपलब्ध करून दिल्या जाव्यात,
असे सांगून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे सांगितले. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्वांना मतदान करता यावे, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी. आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्थिर संनिरीक्षण पथके, भरारी पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात यावा. मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!