ऐन निवडणुकीत शिवनेरीनगर समस्येच्या गर्गेत

795

कोंढवा प्रतिनिधी

सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण जोरात असताना नागरिकांना विविध मूलभूत गरजांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या दैंनदिन गरजा म्हणजेच पिण्यासाठी पाणी, घरात लागणारी लाईट आणि रोजच्या वापरासाठी लागणारे रस्ते या बेसिक गरजा देखील महापालिका, महावितरण पूर्ण करू शकत नाही. बरे लोकप्रतिनिधी देखील याच रस्त्यावरून जात असताना देखील त्यांना खड्डे का दिसत नाही असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. आता विधानसभा निवडणुका अंतिम टप्प्यात असताना आणि रोज वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार घरोघरी भेट देत आहेत, नागरिक त्यांना आपल्या समस्यां सांगत आहेत किंवा काही नागरिक कशाला उगाचच आधीच उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला असून निवडणुका झाल्यानंतर आपण आपल्या समस्यां त्याना सांगू असेच म्हणत आहेत. कोंढवा खुर्द मधील शिवनेरी नगर भागात जाताना आपल्याला विविध समस्यां पहायला मिळेल.


कोंढवा गावाच्या मुख्य रस्त्यावरून जाताना ब्रम्हा ऍव्हनूच्या समोरील गतिरोधकाला वरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने खड्डे पडलेले आहेत तर याच चढावर खडी पसरली असून यामुळे दररोज दुचाकी घसरून छोटेमोठे अपघात होत आहेत. याच सोसायटीच्या चढावरील गेट सामोर महापालिकेच्या पाइपलाइनचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असून काही ठिकाणी पूर्ण झाले असून काही ठिकाणी ते अर्धवट असून अर्धवट असलेल्या ठिकाणी केलेल्या खड्यांमध्ये नागरिक कचरा टाकत आहेत. पुढे लेन नंबर ३६, कुदळे यांच्या घरासमोर गेल्या एक महिन्यापासून दोन मोठे खड्डे पडलेले आहेत पण अद्याप पर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा उमेदवाराचे याकडे लक्ष गेले नाही. तर शिवनेरी नगरच्या सर्व सिमेंट रस्त्यावर खड्डे पडलेले असून ड्रेनेज चे झाकणे आत गेलेली पहायला मिळत आहेत .अराफत मज्जीद येथील लेन नंबर १८ मध्ये गेली काही दिवस पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता पाणी काही लोकांना मिळायचे तर काही लोकांना मिळत नसत याची तक्रार नागरिकांनी अनेकदा अधिकाऱयांकडे केली पण काही उपयोग झाला नाही. परंतु याच परिसरात एक पत्रकार राहत असून त्यांनी कोंढवा पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार करताच त्यांनी चांगला प्रतिसाद देत दोन दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. पाण्याचा प्रश्न मार्गी लागताच आता विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अराफत मज्जीद लेन नंबर १८ येथील डीपी मधून विजेचा दाब कमी अधिक होत असून यामुळे अनेक नागरिकांच्या पाण्याच्या मोटारी तसेच घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहेत. येथे राहणारे चौधरी म्हणाले गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून येथे विजेच्या दाब कधी जास्त तर खुपच कमी होत आहेत ,यामुळे माझ्या घरातील फ्रिज, मिक्सर, पाण्याची मोटार तसेच विजेचं बल्ब जळाले असून खूप मोठा आर्थिक भुर्दड बसला आहे. याबाबतची तक्रार गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच महावितरणच्या ऑनलाईन तक्रारी कडे केली होती , पण कोणीही कसलीही चौकशी केली नाही. यांनतर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तसेच महावितरणच्या ट्विटर केली असून अजूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्यांनी महावितरणाचे अधिकारी पाटील यांना अनेकदा संपर्क केला पण त्यांनी फोन उंचचला नाही अखेर अनेकदा फोन करून त्यांनी फोन उचलून बेडगे नावाच्या कर्मचाऱ्यास पाहणी करण्यास सांगितले , बेडगे यांनी पाहणी करून महावितरणच्या मुख्य प्रवाहांच्या केबल मध्ये दोष असल्याने हा त्रास नागरिकांना होत आहे असे सांगितले तसेच आपण वरिष्ठाना आपण याबाबत माहिती देऊन केबल बदलण्यास सांगू. पंरतु रोज याठिकाणी नागरिकांना विजेच्या त्रासाने घरातील उपकरणे खराब होत आहेत. लोकप्रतिनिधी प्रचारत असून आता तक्रार कोठे करायची असा प्रश्न देखील नागरिक विचारत आहेत.                          याचबरोबर शिवनेरी नगर भागात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून भटक्या कुत्र्यांमूळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, महिला आपला जीव मुठीत धरून चालत असून भटक्या कुत्र्याची दहशत येथे पहावयास मिळत आहे, असे भरत टोंपे यांनी मल्हार न्यूज शी बोलताना सांगितले.नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लोकप्रतिनिधी वेळात वेळ काढून लक्ष देऊन कामे करून द्यावीत अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.