Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeमुंबई/कोंकणरायगडगायिका गीता माळी यांचं शहापूर जवळ अपघाती निधन

गायिका गीता माळी यांचं शहापूर जवळ अपघाती निधन

गिरीश भोपी, पनवेल

नाशिकच्या गायिका गीता माळी यांचं शहापूर जवळ अपघाती निधन झालं. नुकत्याच त्या आपला अमेरिकेचा दौरा आटपून भारतात परतल्या होत्या. मुंबईहून नाशिकला येत असताना ही दुर्घटना घडली आहे. गायिका असलेल्या गीता माळी यांचे शवविच्छेदन झाल्यावर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार आहे. किरकोळ जखमी असलेले विजय माळी हे गंभीर जखमी आहेत. नाशिक येथील प्रख्यात गायिका गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ आज सकाळी अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पती अॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी अमेरिकेतून त्या आपल्या मायदेशी परतल्या होत्या. मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापूर शिवारात एकता हॉटेलसमोर कार आणि टँकरची धडक होऊन हा अपघात झाला . गीता माळी यांच्यासोबत त्यांचे पती विजय माळीसुद्धा या अपघातात जखमी झाले आहेत. शहापूर जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!