क्रांतीगुरू लहूजी साळवे यांच्या स्मारकासाठी राष्ट्रीय लढा उभारणार : अंबादास सुर्यवंशी

933

पुणे प्रतिनिधी,

आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने तसेच लहुजींचे विचार सर्व सामाज्यामध्ये पोहचवण्यासाठी लहूजी आर्मीच्या वतीने देशभर राष्ट्रीय लढा उभारणार असल्याची घोषणा लहूजी आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंबादास सुर्यवंशी यांनी केली. ते लहूजी साळवे यांच्या २२५ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी संगमवाडी येथील समाधी स्थळावर आले होते.
आद्य क्रांतीगुरू हे महात्मा जोतीबा फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीतील आधारवड होते तसेच उमाजी नाईक, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके यांना शस्त्र चालवण्याचे धडे दिले आहे जेणेकरून भारताला स्वातंत्र मिळावे.
लहूजी साळवे मातंग समाज्याच्या अस्मिता व प्रेरणा स्थान असलेले लहूजी साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे यासाठी पक्षाकडून घोषणा करण्यात आल्या मात्र हवेतच विरल्या त्यामुळे समाधी स्थळाला जाण्यासाठी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाला अनेक वेळा निवेदने व आंदोलन करूनही शासनाने आजतागायत परिस्थिती जैसेथे आहे. देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या काणाकोपऱ्यातून लहूजी साळवे यांना मानवंदना देण्यासाठी लहू सैनिक व लहुभक्त मोठ्यासंखेने या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांना अनेक समस्यांना सामोरे लागत आसल्याचे सांगितले.
यावेळी श्रावण वाघमारे, विशाल सकट, संजय दुबळे, जयश तलवारे, सुनिल खुडे, अजय जगताप, उल्हास हनवते, नागेश सुर्यवंशी, तसेच लहूजी आर्मिचे सर्व लहू सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.