33 वी अखिल भारतीय पोस्टल क्रिकेट स्पर्धा समारोप समारंभ प्रेस नोट

472

पुणे प्रतिनिधी,

भारतीय टपाल खात्याच्या वतीने 33 व्या अखिल भारतीय पोस्टल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुण्यामध्ये 16-22 फेब्रुवारी 2020 दरम्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय टपाल खात्याचे सचिव श्री प्रदीप्त कुमार बिसोई यांनी या सोहळ्याचे उदघाटन केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार श्री सुरेंद्र भावे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
भारताच्या 21 पोस्टल सर्कल मधील खेळाडू टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. स्पर्धेमधील सर्व सामने डेक्कन जिमखाना पुणे क्लब, व्हीजन अकॅडमी, फ्लेम युनिव्ह्रर्सिटी, पी वाय सी डेक्कन क्रिकेट क्लब, ब्रिलीयंट अकॅडमी या मैदानावर खेळले गेले. सामान्यांची अद्यावत माहिती cricheros.in या वेबसाइट वर पाहण्याची व्यवस्था टपाल खात्यातर्फे करण्यात आली होती.
या स्पर्धेचा अंतिम सामना हा आंध्रप्रदेश विरुद्ध राजस्थान असा दिनांक 22 फेब्रुवारी 2020 रोजी डेक्कन जिमखाना या मैदानावर पार पडला.
अत्यंत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत आंध्रप्रदेश या संघाने 39.5 षटकात 305 धावा केल्या.आंध्रप्रदेशच्या आर.अच्चुताराव याने 89 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार मारत 91 धावा केल्या व मल्लिरेड्डी अर्जुनकुमार याने केवळ 55 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारासह 89 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. राजस्थान संघासमोर 305 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा सामना करताना राजस्थान संघाने 5 गडी राखून 310 धावा करीत दमदार विजय मिळवत 33 व्या अखिल भारतीय पोस्टल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून विनीत शर्मा यांना गौरविण्यात आले. विनीत शर्मा यांनी 90 चेंडूत 12 चौकरासह 106 धावा केल्या.
समारोप समारंभासाठी भारतीय क्रिकेट टीम चे माजी खेळाडू श्री. चंदू बोर्डे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना श्री. चंदू बोर्डे यांनी प्रथम विजेत्या संघाचे मनपूर्वक अभिनंदन केले. पोस्ट विभागाने तिसर्‍यांदा पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याबद्दल विशेष आभार मानले. त्याबरोबरच एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सामने आयोजित केल्याबद्दल सर्व भारतीय पोस्टल कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. याबरोबरच या स्पर्धेची मोठ्या स्तरावर जाहिरात केल्याबद्दल त्यांनी खूप कौतुक केले. त्यांच्या समवेत पुणे रीजन चे पोस्टमास्तर जनरल कर्नल एस. एफ. एच. रिझवी आणि निदेशक, डाक सेवा, पुणे रिजन श्रीमती. टी. निर्मलादेवी, या सोहळ्यास उपस्थित होते. तसेच श्री गणेश सावळेश्वरकर, पोस्टमास्तर जनरल (बी.डी. मेल्स), श्री व्ही.एस.जयशंकर, पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद रिजन, कर्नल के.सी. मिश्रा ( वी.एस.एम.) निवृत्त चीफ पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र हे देखील या समारंभास उपस्थित होते.
समारोप समारंभात आलेल्या सर्व खेळाडू, पंच, स्कोरर तसेच या स्पर्धांचे तांत्रिक प्रतींनिधी श्री एल. के. माथुर, श्री जे.जे. सिंग आणि श्री रविंद्र पट्टनाईक यांचे आभार मानून त्यांना सन्मानित करण्यात आले.
समारंभाची सांगता पुणे रीजन चे पोस्टमास्तर जनरल कर्नल एस. एफ. एच. रिझवी यांच्या हस्ते ध्वज उतरवून करण्यात आली.
***