एव्हरेस्ट बेटर किचन पाककला स्पर्धेला पुणेकरांकडून उत्तम प्रतिसाद..

579

पुणे प्रतिनिधी

एव्हरेस्ट बेटर किचनने पुण्यामध्ये आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेला म्हणजे क्युलिनरी चॅलेंजला पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या क्षेत्रात नव्यानेच उतरलेल्या शेफच्या २४ गटांनी यात सहभाग नोंदविला. नव्यानेच या क्षेत्रात येत असलेल्या शेफसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती.

पुणे आणि परिसरातील हॉस्पिटॅलिटी कॉलेजमधील तरुण शेफने या स्पर्धेत भाग घेऊन आपले पाककला कौशल्य सादर केले. देशभरातील मोठ्या शहरात हि स्पर्धा आयोजित करण्यात आली. पुणे हे या स्पर्धेतील सहावे शहर आहे. देशातील विविध शहरात जिंकलेल्या स्पर्धकांना एका मोठ्या अंतिम स्पर्धेसाठी मार्च 2020 मध्ये मुंबई येथे आमंत्रित करण्यात येईल.

भारतातील खाद्यपदार्थ लोकप्रिय व्हावे, त्यामध्ये मुल्यवर्धन व्हावे, आरोग्यास उपयुक्त खाद्यपदार्थ तयार करुन खाण्याची सवय लागावी. यादृष्टीकोनातून या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. यात भारतातील मुळच्या पदार्थावर भर दिला जात आहे. पुण्यातील स्पर्धेत महाराष्ट्रातील पदार्थ त्यातल्या त्यात पुण्यातील स्पर्धेत भर देण्यात आला.

एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ़ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजीजच्या प्राचार्य डॉ. सोनाली जाधव यांनी स्पर्धकांना त्यांचे नाविन्यपुर्ण पदार्थ आणि कार्यक्षमरित्या बनविण्याच्या पद्धतीचे परिक्षकासमोर सादरीकरण करण्यास सांगितले. परिक्षकांमध्ये प्राईड हॉटेलचे शेफ मंगेश वझरकर, सदस्य शेफ, सिंबॉयसिस इन्स्टीट्यूट ऑफ़ कलनरी आर्टसच्या प्रमुख मनोज पाटकर, डब्लूआयसीएचे सदस्य गौरव एकाल, हॉटेल मालक रुपा पुलेंद्रे होते. यावेळी स्पर्धेला इंधन प्रायोजक असलेल्या भारत गॅसचे क्षेत्रिय विक्री अधिकारी आशिष रंजन यांनी स्वयंपाकावेळी सुरक्षेचे महत्व सांगितले.

सर्वच स्पर्धकांनी उत्तम आणि नाविन्यपुर्ण पाककृती सादर केल्यामुळे विजेते निवडणे परिक्षकांना अवघड झाले होते. या स्पर्धेत एव्हरेस्ट शाही पणीर मसाला सर्वोत्कृष्ठ पाककृती ठरली. दुस-या क्रमांकावर एव्हरेस्ट ड्राय जिंजर व तिस-या क्रमांकावर एव्हरेस्ट शाही गरम मसाला या पाककृतींची निवड झाली.

बेटर किचनच्या प्रकाशक एकता भार्गव म्हणाल्या कि, एव्हरेस्ट बेटर किचन स्पर्धेमुळे देशभरात नवे शेफ़ तयार होऊ लागले यामुळे त्यांना पाककलेतील त्यांचे कौशल्य सादर करण्याची संधी मिळत आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व शैक्षणीक संस्थांचे त्यांनी आभार मानले.

एव्हरेस्ट स्पाईसेस या स्पर्धेचा प्रमुख प्रायोजक होता. त्याचबरोबर भारत गैस, प्राईड हॉटेल, वाघबकरी चहा समुह व युनायटेड डिस्ट्रीब्युटर, किचन नियतकालिक व एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ़ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजीने यांनी यासाठी सहकार्य केले. त्याचबरोबर या स्पर्धेला वेस्टर्न शेफ़ असोसिएशन (डब्लूआयसीए) आणि हॉस्पिटॅलिटी पर्चेसिंग मॅनेजर्स मंच (एचपीएमएफ) ने ही सहकार्य केले.