शिवजयंतीनिमित्त “शिवनेरी भूषण “पुरस्काराचे वितरण

747

गणेश जाधव, कोंढवा

पुण्यातील कोंढवा खुर्द येथील शिवनेरी नगर परिसरात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या शिवजन्मोत्सवानिमित्त “शिवज्योत लोककल्याण संस्था व श्री साईलीला ट्रस्ट” यांच्या संयुक्त विद्यमाने नितीन मोरे प्रस्तुत “महाराष्ट्राची लोकधारा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांकरिता घरगुती वापराच्या वस्तूचे लकी ड्रॉ तसेच “शिवनेरी भूषण पुरस्कार” हा आगळावेगळा पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पाडण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजक विनोद शेठ गव्हाणे ,अशोक दुबे व धनराजदादा भणगे यांनी समाजात एक सामाजिक संदेश देण्याच्या विचाराने प्रेरित होऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून “शिवनेरी भूषण “पुरस्कार देण्याचे ठरविले.

शिवनेरी भूषण पुरस्काराबाबत विचारले असता ,विनोद शेठ गव्हाणे यांनी सांगितले की ,शिवनेरी नगर मध्ये अनेक प्रकारे समाजातील विविध घटक योगदान देत असतात तर अशा समाजघटकांचा आदर सत्कार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे मानून त्यांनी शिवनेरी भूषण पुरस्कार देण्याचे योजले.शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन त्यांनी केलेल्या समाजकार्याचा बहुमान त्यांना मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले .शिवनेरी भूषण पुरस्कार हा सामाजिक, राजकीय शैक्षणिक ,वैद्यकीय तसेच पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येत आहे .अशा समाज घटकात मुळेच समाजाची उन्नती होते हे निश्चित असे मत देखील व्यक्त करण्यात आले.

शिवनेरी भूषण पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे
सामाजिक क्षेत्र व वारकरी संप्रदाय
१) ह.भ.प पंढरीनाना लोणकर
२) पुंडलिक रावडे
३) आप्पा सुगावकर
४) सागर लोणकर

शैक्षणिक क्षेत्र
१)शारदाताई लोणकर
२)औटी सर

वैद्यकीय क्षेत्र
१)डॉ.तांबोळी
२)डॉ.रियाज शेख
३)डॉ.मिश्रा
४)डॉ.विनोद शेठ
५) डॉ. निशा

पत्रकार क्षेत्र
१)अनिल चौधरी
२)सुरेश गुप्ता
३)मोरे

यांना शिवनेरी भूषण पुरस्कार माजी आमदार महादेव बाबर व उपस्थित मान्यवरांच्या कडून प्रदान करण्यात आला..
याप्रसंगी महिलांकरता घरगुती वस्तूंचे लकी ड्रॉ काढण्यात आले यामध्ये एकूण पाच बक्षीस देण्यात आली

प्रथम बक्षीस:- फ्रीज
द्वितीय बक्षीस:- 32 इंच एलईडी टीव्ही
तिसरे बक्षीस :-बजाज कुलर
चौथे :-स्मार्टफोन
पाचवे :-ओवन
सहावे :-मिक्सर

याप्रसंगी हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार महादेव बाबर ,माजी नगरसेवक भरत चौधरी ,तानाजी लोणकर ,विनोदशेठ गव्हाणे, महेंद्र गव्हाणे, दिनेश गव्हाणे, अंबादास शिंगे, हनुमंत गायकवाड ,अशोक गोते, सतीश गोते विजय गव्हाणे, संजय लोणकर ,सचिन कापरे, अशोक दुबे तसेच शिवनेरी नगरचे समस्त नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते .
अशा पुरस्कार सोहळ्यामुळे सर्वसामान्यांना सामाजिक कार्याची गोडी निर्माण होईल व एक आदर्श समाज घडवला जाईल असे मत वरिष्ठ पत्रकार अनिल चौधरी यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले..