परफेक्शनिस्ट आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर!

482

पुणे प्रतिनिधी,
पुण्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यापासून आजपर्यंत प्रशासन अहोरात्र कार्यरत आहे.प्रशासन,आरोग्य विभाग,पोलीस विभाग संयुक्तरित्या काम करत आहेत. या सर्वांची योग्य सांगड घालून सुसूत्रता आणण्याचे महत्वाचे काम विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर हे सक्षम व समर्थपणे करीत आहे.
त्यांच्या सूक्ष्म नियोजनाचे कौशल्य खरोखर वाखाणण्याजोगे आहे.
यापूर्वीही विभागातील अधिकारी,कर्मचारी यांना पूरपरिस्थिती,दुष्काळ,अवकाळी पाऊस,लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याप्रसंगी डॉ. म्हैसेकर यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे अतिरिक्त कोणत्याही प्रकारचा ताण न पडल्याचा अनुभव आहे.
कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी एकीकडे बैठका सुरू असताना त्यातील निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा आग्रह हा येणाऱ्या आपत्तीपूर्वीची सज्जता अशीच अनुभूती देणारा ठरत आहे.शासकीय प्रसार माध्यमाचे घटक असल्याने जवळून अनुभवतो आहे.
कोरोनाचा मुकाबला करताना सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवत ही परिस्थिती भविष्यात हाताबाहेर जाणार नाही ,याकडे त्यांचे विशेष लक्ष असते.
डॉ.म्हैसेकर यांच्या सूक्ष्म नियोजन आणि दूरदृष्टीमुळे कोरोनाचा उद्रेक पुणे विभागामध्ये नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.सर्वच प्रशासकीय यंत्रणेने घेतलेल्या खबरदारी आणि उपाययोजना यांचे ते फलीत म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
खाजगी हॉस्पिटलकरिता प्रशासन हँड ग्लोव्हज,मास्क,पीपीई किट पुरवत आहे.मात्र हे सर्व साहित्य डॉ. म्हैसेकर स्वतः बारकाईने तपासूनच वितरित करण्याच्या सूचना देत आहेत.कालच त्यांच्या समवेत भारती हॉस्पिटलमध्ये जाण्याचा योग आला.भारती हॉस्पिटलच्या प्रशासनाने कोरोनाच्या रुग्णांसाठी केलेली ICU आणि आयसोलेशन व्यवस्था त्यांनी समक्ष पहिली.रुग्णालयाचे इतर वॉर्ड,यंत्रणा व इतर रुग्णांवर परिणाम होणार नाही, यासाठी त्यांनी दिलेल्या सूचना प्रशासकीय अनुभवाची पावती म्हणावी लागेल. सोबत नमुन्यादाखल आणलेले पीपीई किट त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांस घालण्यास सांगितले आणि यात काय सुधारणा आवश्यक वाटतात असे त्यास विचारले,एवढ्यावरच न थांबता तुमच्या रुग्णालयाच्या डॉक्टर्स,नर्सेस यांना या किटमध्ये काही सुधारणा हव्या असल्यास हा घ्या त्या किट उत्पादकांचा फोन नंबर,आणि त्यांना या किटमध्ये काही सुधारणा हव्या असल्यास लगेच सुचवा असे सांगितले .तात्पर्य अशा बारीकसारीक बाबतीतही गुणवत्ता,दर्जा आणि चांगला रिझल्ट यांची अपेक्षा ठेवणारे डॉ. म्हैसेकर अशा अनेक अनुभवांमुळे परफेक्शनिस्ट आयुक्त वाटतात!