पुणे प्रतिनिधी,
कोविड-19 संदर्भात, परदेशातून साधनांचा पुरवठा सुरु झाला असून, चीनने देणगी म्ह्णून दिलेली 1.70 लाख पीपीई (वैद्यकीय कर्मचाऱ्यासाठीचे वैयक्तीक संरक्षण साधन संच) भारतात आली आहेत. देशातल्या 20, 000 पीपीई सह एकूण 1.90 लाख पीपीई आता रुग्णालयांना वितरीत करण्यात येतील, देशात सध्या उपलब्ध असलेल्या 3,87,473 पीपीईमधे याची भर पडणार आहे. केंद्र सरकारने 2.94 लाख पीपीई आतापर्यंत पुरवली आहेत.
याशिवाय, देशात निर्मिती करण्यात आलेले, 2 लाख एन 95 मास्क, विविध रुग्णालयांना पाठवण्यात येत आहेत. यासह केंद्र सरकारने आतापर्यंत 20 लाखाहून अधिक एन 95 मास्क पुरवले आहेत.
नव्याने आलेल्या साहित्यापैकी, जास्त साहित्य, तामिळनाडू, महाराष्ट्र
कोविड-19 वर मात करण्यासाठीच्या प्रयत्नात,पीपीईचा परदेशातून पुरवठा सुरु होणे हा महत्वाचा टप्पा आहे. एन 95 मास्क सह, 80 लाख पूर्ण पीपीई संचांची ऑर्डर सिंगापूरच्या आस्थापनाकडे आधीच नोंदवण्यात आली आहे,हा पुरवठा,येत्या 11 एप्रिल पासून सुरु होईल, असे सूचित करण्यात आले आहे, येत्या 11 तारखेला 2 लाख तर त्यानंतरच्या आठवड्यात आणखी 8 लाख पीपीई मिळण्याची अपेक्षा आहे. 60 लाख संपूर्ण पीपीई संचाची ऑर्डर देण्यासंदर्भात चीन मधल्या कंपनीशी बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. एन 95 मास्क आणि संरक्षक गॉगल यासाठी विदेशी कंपन्यांकडे स्वतंत्र ऑर्डर नोंदवण्यात आली आहे.
देशाअंतर्गत क्षमतेला जोड देण्यासाठी, उत्तर रेल्वेने पीपीई विकसित केले आहे.ही पीपीई, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने याआधी विकसित केलेल्या व्यतिरिक्त आहेत.याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या एन 95 मास्क उत्पादकानी, आपली क्षमता वाढवून 80,000 मास्क प्रतीदिन केली आहे.
दर आठवड्याला सुमारे 10 लाख पीपीई संचाचा पुरवठा प्राप्त करणे हे उद्दिष्ट असून देशातल्या रुग्णांची संख्या पाहता सध्या पुरेशी संख्या उपलब्ध आहे.या आठवड्यात आणखी पुरवठा अपेक्षित आहे.